सोलापूर : बलात्काराच्या खटल्यात आरोपीला पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे जामीन मिळाल्याच्या संशयावरून पीडित बलात्कारित तरूणीने दोघांना सुपारी देऊन पोलीस हवालदाराचा खुन करण्याचा प्रयत्न केला. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे हा प्रकार घडला. गोपाळ गणपत भोसले (वय ४२) असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित बलात्कार पीडित तरूणीसह सुनील रणदिवे (वय २६, रा. नातेपुते) अन्य दोन अनोळखी तरूणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेच पुढं मुख्यमंत्री राहावेत, तर देवेंद्र फडणवीसांनी…”, शिंदे गटातील नेत्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नातेपुते पोलीस ठाण्यात समाधान सकट नावाच्या तरूणाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यास अटक झाली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. परंतु पोलिसांमुळेच त्याला जामीन मिळाला, असा संशय बलात्कार पीडित तरूणीला वाटत होता. त्यातूनच तिने संबंधित पोलीस हवालदार गोपाळ सकट यांच्याशी संपर्क साधून, तुमच्याकडे जरूरीचे काम असल्याची थाप मारून त्यांना रात्री उशिरा नातेपुते बाह्यवळण रस्त्यावर बोलावून घेतले. परंतु बलात्कार पीडित तरूणीच्या सांगण्यावरून सुनील रणदिवे आणि अन्य दोन अनोळखी तरूणांनी हवालदार सकट यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे हे पुढील तपास करीत आहेत.