Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओवरुन मनसे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मनसेच्या संदीप देशपांडेंनी ही क्लिप पोस्ट केली होती. ही क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लिपवरुन आता जितेंद्र आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) गंभीर आरोप केला आहे. तसंच राज ठाकरेंना सुपारी ठाकरे असंही जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी म्हटलं आहे.
ती ऑडिओ क्लिप सहा वर्षांपूर्वीची
मी ऑडिओ क्लिप ऐकली, ती पाच ते सहा वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. तेव्हाच्या आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं नाव मी क्लिपमध्ये घेतलं आहे. मल्लिकार्जुन यांना पक्षात मीच आणलं आहे. त्या सगळ्या मागचं बॅकग्राऊंड मी सांगू इच्छित नाही. पण सहा वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप क्लिप मिळतील. सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी ठाकरे सुपारी घेणारच ना? असा खोचक प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) विचारला आहे आणि राज ठाकरेंना सुपारी ठाकरे म्हटलं आहे. मी मीडिया ट्रायलला घाबरत नाही. ती परिस्थिती काय होती ते कुणाला माहीत नाही. जर इतकं सगळं होतं तर माझ्यावर पोलिसांनी केस का दाखल केली नाही? असंही आव्हाड ( Jitendra Awhad ) म्हणाले.
व्हायरल क्लिपमुळे काय झालं?
जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल क्लिपमुळे आता मनसे आणि आव्हाड यांच्यातच खडाजंगी होणार असल्याचे दिसून येते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ शेअर केला आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारी ठाकरे असाही केला आहे. त्यामुळेही वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
राज ठाकरेंनीच माझा आवाज काढला
राज ठाकरे बदलापूरला आतापर्यंत का गेले नाहीत,अशा प्रकरणात माणुसकीच्या नात्याने चोवीस तासांत पोहोचायला हवं. मराठी मनाचा अभिमान असणारे राज ठाकरे तुमचा हात त्या पोरीच्या आईच्या डोक्यावरुन, पोरीच्या बापाच्या डोक्यावरुन फिरवायला हवा होता, आणि माझ्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच, मी जर सांगितलं की, माझा हा आवाजच नाही तर हे काय तपासायला जाणार आहेत? मी सांगतो हा माझा आवाजच नाही, राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात त्यांनीच माझा आवाज काढून क्लिप तयार केली, तुम्हाला माहीत आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.