मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली जात आहे. सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमप्रश्न हाताळता येत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकून केली जात आहे. राज्यात सीमावाादाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कर्नाटकमधील काही संघटनांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाहनांना काळं फासलं आहे.

हेही वाचा >>> Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेस ‘मॅजिक फिगर’ गाठण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ रोखण्यासाठी आमदारांना शिमला किंवा चंदिगडमध्ये बोलवणार

कर्नाटकचे समर्थन करणाऱ्या काही संघटनांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वाहनांना अडवले आहे. त्यांनी कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासले आहे. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी तर वाहनांवर चढून आंदोलन केले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> गुजरात राज्यात ‘आप’चा प्रवेश, राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येणार? मनिष सिसोदिया म्हणाले “संपूर्ण देशाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कर्नाटकच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमेवरील परिस्थिती निवळली नाही, तर मला तेथे जावे लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. तर शरद पवार फक्त बोलत नाहीत, तर ते करून दाखवतात. शरद पवार सीमेवर गेले तर तेथे अख्खा महाराष्ट्र असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. हे सकार नामर्द आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.