वाई: मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला साताऱ्यात अल्पसा प्रतिसाद मिळाला. वाई पाचवड वगळता सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला साताऱ्यात अल्पसा प्रतिसाद मिळाला. सातारा, कोरेगाव, लोणंद, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होते. वाई पाचवड भुईंज येथील अत्यावश्यक व्यवहार, बँका, शाळा सुरु होत्या. व्यापारी पेठ बंद होती. मेढा येथील व्यापारी संघाने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला होता. मात्र यापूर्वी वेळोवेळी या आंदोलनासाठी बंद पुकारण्यात आलेला आहे त्यामुळे आजचा बंद रद्द करण्यात आला होता.

rain in Sangli and the northern parts of Tasgaon
सांगली, तासगावात पावसाने दिलासा
Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

हेही वाचा – धाराशिव : टँकरने दोन शाळकरी मुलीला चिरडले, एकीचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

हेही वाचा – “मी मेलो तर…”, मनोज जरांगेंचं आंदोलकांना भावनिक आवाहन; म्हणाले, “येत्या १९ फेब्रुवारीला…”

सातारा शहरात सकाळपासूनच सरळ व्यवहार सुरळीत सुरू होते. कुठेही बंदचा लवलेशही नव्हता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाई शहरात सायंकाळी काही व्यवहार सुरळीत सुरू झाले.