Maharashtra Rain Updates : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असून मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे.
IMD Weather Forecast Today LIVE News Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारणार, 'सिंधुरत्न समृद्ध योजने'तून १५ कोटींची तरतूद
पुण्यात मुसळधार पाऊस पडतोय, आम्हाला वर्क फ्रॉम होम द्या! थेट मुख्यमंत्र्यांकडे आयटी कर्मचाऱ्यांची मागणी
Mumbai Rains : मुंबईकरांनो घराबाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीसाठी कोणते रस्ते चालू आणि कोणते बंद; पाहा लोकल सेवेची स्थिती
पाच तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत
हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राथिकरणाने मुंबई व उपनगरांमधील सर्व शासकीय व खासगी शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
बिहारमध्ये महाराष्ट्राची चर्चा!
Sindhudurg Rain News: मुसळधार पावसामुळे मालवणच्या आचरा रस्त्यावर गाडी पाण्यात, कुटुंब थोडक्यात बचावले
पक्षांतरावरून जयंत पाटील यांचा अजित पवारांना चिमटा
मुंबईत मुसळधार पाऊस! सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना महत्त्वाचे आदेश
मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी
खासगी कार्यालये/ आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना द्याव्यात, असा आदेश मुंबई महापालिकेने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.
तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यात विक्रेत्यांना यंदा ठेवावी लागणार गणेशमूर्तींची नोंद, महापालिकेने काय केल्या सूचना ?
खड्डेमुक्त रस्ते अन् स्वच्छतागृहांचीही तीन वेळा स्वच्छता ? पुणे महापालिकेने का केला निर्धार
Thane Rain Alert : ठाण्यात आजही मुसळधार… डोंबिवली स्थानक परिसर जलमय तर, बदलापूरात पावसाची संततधार
‘शालार्थ’बाबत शिक्षकांना अनेक अडचणी… शिक्षणमंत्र्यांकडे मागणी काय?'
पुणे : घाट परिसराला झोडपले, शहरातही संततधार… ताम्हिणी येथे तब्बल ३२० मिलिमीटर पावसाची नोंद!
अवाजवी शुल्काबाबत आता तक्रार नोंदवता येणार… काय आहे प्रक्रिया, कागदपत्रे काय लागणार?
वसई, विरारला पाणीपुरवठा करणारी धरणे 'तुडुंब', धामणी धरणात ९२ टक्के तर पेल्हार आणि उसगाव धरणे १०० टक्के भरली
Mumbai Rain Update : मुंबई पुन्हा जलमय होण्यास सुरुवात; अनेक भागांमध्ये पाणी साचले
मुंबईत सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी सकाळपासूनच जनजीवन विस्कळित होण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी भुयारी मार्ग, मानखुर्द भुयारी मार्ग जलमय झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच, दादर टिटी, शीव, अँटॉप हील परिसरात पाणी साचायाला सुरुवात झाली आहे.

डोंबिवलीत रेल्वे रुळांवर पाणी

मुंबई लोकल सेवा खोळंबली
रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात
१५० जनावरे दगावली
नांदेड जिल्ह्यात पुरामुळे किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. जिल्ह्यात सुमारे १५० जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरात अडकलेल्या २९३ नागरिकांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले.
राज्यात पावसाचे आठ बळी; नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
राज्याच्या सर्व विभागांत गेल्या ४८ तासांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पावसामुळे आतापर्यंत किमान आठ जणांचा बळी गेला आहे. बचाव पथकांनी वेगवेगळ्या भागांमधील ३०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे सहा ते सात गावांत पूरस्थिती आहे.
Mumbai Heavy Rain Updates : हवामान विभागाकडू मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Mumbai Heavy Rain Updates : मुंबईत एकाचा मृत्यू, एक जण बेपत्ता
मलबार हिल येथील नेपियन सी रोड परिसरातील शिमला हाऊस येथे संरक्षक भिंत अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. सतीश तिर्के असे यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, वांद्रे येथील कनकिया पॅलेस इमारतीजवळील बीकेसी पुलावरून मिठी नदीत उतरलेला युवक बेपत्ता आहे. वरदान जंजोतार (२४) असे त्याचे नाव आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. सोमवारी पावसाने आणखी जोर पकडला. सकाळी ११ नंतर मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, शीव, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, अंधेरी, सांताक्रुझ, कुलाबा या भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला.