Live Marathi News Updates, 24 June 2025 : मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणीही आज पार पडते आहे. यातली एक जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकली आहे अशीही बातमी समोर आली आहे. तर पहिलीपासून जो हिंदी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता त्यााबाबत राज्य सरकारने तूर्तास एक पाऊल मागे घेतलं आहे. याबाबत राज ठाकरेही बोलण्याची शक्यता आहे. तर उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारा म्हणत थेट ऑफर दिली आहे. या आणि अशा सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Maharashtra Breaking News Highlights मुंबईत पावसाच्या सरी, लोकल वाहतुकीचा वेग मंदावला; यासह महत्त्वाच्या घडामोडी
कुडाळमधील माणगाव खोऱ्यात तरुण पुरात वाहून गेला, एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू
Cow Attack Video : नाशिकमधील कळवणमध्ये मोकाट गाईंच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, एक जण जखमी
Devendra Fadnavis : "झूठ बोले कौवा काटे…", देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर; म्हणाले, "तुम्ही हवेत बाण…"
प्रवासी बेसुमार, सुरक्षा अपुरी; केवळ १०५ कर्मचाऱ्यांवर वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा भार
वसई : मागील काही वर्षात रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढली आहे. या वाढत्या गर्दीमुळे रेल्वेस्थानकातील गुन्हेगारी, सुरक्षा, अपघात, गस्त अशा विविध बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ हवे आहे. मात्र वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा भार हा केवळ १०५ इतक्या कर्मचाऱ्यांवर आहे. या अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असतो.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, पेरणीच्या कामांना वेग
बोईसर : पालघर जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. ग्रामीण भागातील काही पूल पाण्याखाली गेले तसेच रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दिवसभराच्या पावसानंतर रात्रीपासून पावसाने उसंत घेतली. चांगल्या पावसाने पेरणीच्या कामांना देखील वेग आला आहे.
रायगड जिल्ह्यातील ३८९ इमारती धोकादायक, प्रशासनानं घेतला मोठा निर्णय…
अलिबाग- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ३८९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ… निम्म्या जळगाव जिल्ह्यास दिलासा
जळगाव – तापी नदीवरील जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पानंतर गिरणा नदीवरील सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीतही चांगली वाढ होत आहे. दोन्ही प्रकल्पांच्या उपयुक्त साठ्यात अलिकडील दिवसात झालेली वाढ लक्षात घेता जवळपास अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गंगापूरसह उत्तर महाराष्ट्रातील पाच धरणांमधून विसर्ग, गोदावरीच्या पातळीत पुन्हा वाढ
नाशिक – सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांचा जलसाठा २५ हजार २०२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नाशिक : सरासरीपेक्षा १३ तालुक्यांत अधिक पाऊस; इगतपुरी, मालेगावमध्ये प्रमाण कमी
नाशिक – जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एक ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीतील सर्वसाधारण १३४ मिलीमीटर पावसापेक्षा यंदा अधिक आहे.
वर्धा : पालकमंत्र्यांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी, मात्र नागरिक झाले आनंदी, अशी आहे घडामोड…
वर्धा : शहरातील सार्वजनिक मैदानावर पहिला हक्क तो स्थानिक नागरिकांचा. त्यानंतर सभा, मेळावे, नेत्यांचे कार्यक्रम. मात्र आता शहरातील प्रमुख मैदाने विद्रूप झाल्याच्या स्थितीत असून खेळाडूंची खेळ व नागरिकांची भ्रमंती ठप्प पडली आहे. कारण लोकसभा निवडणूक व अन्य कार्यक्रमात या मैदानाचा वापर झाला आणि त्यानंतर ती तशीच गलिच्छ अवस्थेत सोडून देण्यात आली. त्याबद्दल तक्रारी पण झाल्यात. मात्र प्रशासन ढिम्म. अखेर जिल्हा नियोजन समितीत हा प्रश्न आला.
राज्यात जमिनीच्या तुकडे बंदी कायद्यात लवकरच सुधारणा, महसूल मंत्र्यांचे सुतोवाच
नागपूर : महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
चंद्रपूर : ९५ लाखाच्या वादग्रस्त भिंतीची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी
चंद्रपूर: आमदार किशोर जोरगेवार यांनी मित्राच्या बंगल्यासाठी एका नाल्यात बांधलेल्या ९५ लाखाच्या भिंतीची नागपूरच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाने चौकशी सुरू केली आहे. या दक्षता पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता अनंत जगताप यांनी सोमवार २३ जून रोजी चंद्रपुरात येवून नाल्यातील भिंतीची पाहणी केली.
पूजा खेडकरनंतर डाॅ. सचिन ओम्बासे, बनावट कागदपत्रांच्या आधारे आयएएस केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश
नागपूर: सोलापूर महापालिकेचे आयुक्त डाॅ. सचिन ओम्बासे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नोकरी (आयएएस) मिळवल्याच्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून डॉ. ओम्बासे यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तसा अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.
विदर्भवासीयांना वंदे भारत एक्स्प्रेसची अजूनही प्रतीक्षाच; मुंबई, पुणे सेवा सुरू होणार?
अमरावती : मुंबई ते हावडा मार्गावर रेल्वेसेवा सुरू होऊन सुमारे १२५ वर्षे झाली आहेत. विदर्भवासीयांना मुंबईला जाण्यासाठी निवडक एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादी लांब असते. मुंबई आणि पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी, ही विदर्भवासीयांची इच्छा केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षणमंत्र्यांचे निर्देश दुर्दैवी, स्वच्छता कोणी करायची शासनानेच सांगावे, शिक्षक संघटनांचा सवाल
वर्धा : बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे येणार म्हणून सफाई करण्यात आली. ही साफसफाई विद्यार्थ्यांकडून घेण्यात आल्याची ओरड होत आहे. दीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार म्हटल्यावर शालेय परिसराची साफसफाई करणे भाग असते. शिक्षक मुलांकडून साफसफाई करवून घेत असल्याची चर्चा सुरू झाली. शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नाराजी नोंदविली आहे.
चंद्रपूरचा प्रणय जनबंधू पहिल्याच प्रयत्नात फ्लाइंग ऑफिसर
राहुल गांधी याची एक्सवर पोस्ट, फडणवीस यांच्या मतदारसंघात ५ महिन्यांत ८ टक्के मतदार वाढले
डोंबिवली : ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा
"फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढले, काही बूथवर ५० टक्के वाढ", राहुल गांधींचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्र्राचे शत्रू-संजय राऊत
देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वात आधी मराठी शाळांची जी दुरवस्था आहे त्याबाबत काम केलं पाहिजे. मराठी भाषेला कसं बळ कसं मिळेल आणि मराठी माणूस, मराठी मातीत सन्मानाने कसा जगू शकेल हे पाहिलं पाहिजे. तो अदाणी, लोढा यांचा गुलाम बनू नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी येतं. महाराष्ट्र आणि हिंदी यांचं वैर असतं तर हिंदी चित्रपट, साहित्य, शाळा हे सगळं चाललं असतं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असंही राऊत म्हणाले.
पुढील चार वर्षांत एसटीला फायद्यात आणणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : भांडुपमध्ये घराची भिंत कोसळून दोन बालकांसह तीन जखमी
Mumbai Rain News: पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता
दादरवरून थेट अयोध्या-प्रयागराज यात्रेसाठी रेल्वे
पिंपरी चिंचवड: फेरीवाला क्षेत्राचा न सुटलेला तिढा
रेल्वे अपघातातील १४ हजार मृतांची ओळख पटेना, रेल्वे पोलिस नातलगांच्या शोधात
डोंबिवली, कल्याण, अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक; १२१ वाहनांवर आरटीओची कारवाई
धारावीकरांसाठी चतु:स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा; सर्वेक्षणातील त्रुटी दूर करत रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण केले जाणार
मुंबई पाऊस ताज्या बातम्या लाईव्ह अपडेट्स
मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणीही आज पार पडते आहे. यातली एक जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकली आहे अशीही बातमी समोर आली आहे