Maharashtra Political News Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र, यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह कुणाचं यावर निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.

Live Updates

Maharashtra News Today 07 February 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा निकाल, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात!

18:48 (IST) 7 Feb 2024
Maharashtra News Live: मनसे नेत्यांशी बैठकीवर फडणवीस म्हणाले...

येत्या निवडणुकांसाठी भाजपा नेत्यांच्या मनसे नेत्यांशी काही बैठका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. यावरून तर्क-वितर्क सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता "ती तर नियमित बैठक होत असते", अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

18:42 (IST) 7 Feb 2024
तपास यंत्रणा वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय-राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…

18:07 (IST) 7 Feb 2024
अजितदादा गटाचा कोल्हापुरात जल्लोष

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या कडे असल्याचा निकाल दिल्यानंतर बुधवारी येथे अजितदादानिष्ठ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षावर हक्क कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाकडे दावे दाखल करण्यात आले होते.आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह बहाल केले आहे. तर शरद पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्हाची माहिती देण्याची सूचना केली आहे.

या निकालानंतर आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. लोकांना , एकमेकांना पेढे भरवण्यात आले. यावेळी आदिल फरास, मधुकर जांभळे, संतोष धुमाळ, जाहिरा मुजावर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी अजित पवार यांच्या मागे राज्यातील कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कार्यकर्ते दादांसोबत कायमच राहिले आहेत. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक रुजवण्यासाठी या निकालाचा मदत मोठी मदत होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला.

18:02 (IST) 7 Feb 2024
सोलापूर विद्यापीठात बीएस्सी परीक्षेत ५० गुणांच्या पेपरला ९९ गुण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळी कारभार पुन्हा उजेडात आला आहे. बिएस्सी  द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या परीक्षेत ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ९९ गुण देण्यात आल्याचे दिसून आले. सविस्तर वाचा…

18:00 (IST) 7 Feb 2024
सांगली: शेतात महिलेचा गर्भपाताचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल

दोन मुली झाल्यानंतर गर्भवती महिलेचा शेतातील शेडमध्ये गर्भपात करण्याचा धयकादायक प्रकार आटपाडी तालुक्यात रानवस्तीवरील शेडमध्ये उघडकीस आला. सविस्तर वाचा…

17:57 (IST) 7 Feb 2024
सांगली : आष्ट्यातील डांगे महाविद्यालय इस्रोच्या मदतीने लघु उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार

सांगली : आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी इस्रोच्या सहकार्याने महाविद्यालयाचा लघु उपग्रह (नॅनो सॅटेलाईट) जून २०२६ पर्यंत अवकाशात प्रक्षेपित करणार असल्याची माहिती इस्त्रोचे उपसंचालक डॉ. वेंकटेश्‍वर शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा...

17:43 (IST) 7 Feb 2024
Maharashtra Political News Live Update: संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हे पंतप्रधानांचं भाषण असायला हवं होतं. पण ते एका भाजपा नेत्याचं भाषण ठरलं. ते एक निवडणूक प्रचारातलं भाषण ठरलं. जर पंतप्रधान संसदेत खोटं बोलू लागले, तर काय होणार? - संजय राऊत</p>

https://twitter.com/ANI/status/1755191540073341051

17:39 (IST) 7 Feb 2024
मानखुर्दमधील नाल्यात तरुणाचा मृतदेह

मुंबई: मानखुर्दमधील एका नाल्यात बुधवारी सकाळी पोलिसांना एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घाटकोपर - मानखुर्द जोड रस्त्यावरील मानखुर्द मायक्का मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या नाल्यात नागरिकांना एक मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी तत्काळ याबाबतची माहिती मानखुर्द पोलिसांना कळवली. मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. २५ ते ३० वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून पोलिसांनी पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.

तरुणाच्या अंगावर काही जखमा असल्याने आज्ञात इसमाने त्याची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

17:38 (IST) 7 Feb 2024
गायिका मुग्धा वैशंपायनला मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक

मुंबई : सारेगमप लिटल चॅम्प्समधून आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे टॉप ५ स्पर्धक महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. सध्या हे पाचही जण संगीत क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी झेप घेत आहेत. विविध ठिकाणी गायन कला सादर करीत असताना मुग्धा वैशंपायन हिने स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.

वाचा सविस्तर...

16:40 (IST) 7 Feb 2024
नागपूर : चक्क बसमध्ये आढळला बॉम्ब…..

ही माहिती कळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा आणि बीसीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली. याशिवाय दहशतवादी विरोधी पथकही दाखल झाले.

सविस्तर वाचा...

16:38 (IST) 7 Feb 2024
महेश गायकवाड गोळीबार प्रकरणातील गणपत गायकवाड यांचा समर्थक विक्की गणात्रा अटकेत, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाड यांचा समर्थक विक्की गणात्रा यांना मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सुरूवातीला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक केली आहे. सविस्तर वाचा…

16:13 (IST) 7 Feb 2024
पेंच व्याघ्रप्रकल्प ५२ मगरींचे माहेरघर, सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांचीही नोंद

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातच मगर नाहीत, तर पेंच व्याघ्रप्रकल्पातसुद्धा मगर आणि कासवांचा अधिवास आहे. या व्याघ्रप्रकल्पात दुसऱ्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. यात ५२ मगर तसेच सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांची नोंद घेण्यात आली.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 7 Feb 2024
मराठा, गोवारी समाजानंतर आता आरक्षणासाठी हलबा समाजाचे नागपुरात शक्तीप्रदर्शन

शासनाने आदिवासी हलबा समाजाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीही होत नसल्याने हलबा समाजात प्रचंड असंतोष आहे.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 7 Feb 2024
मुंबई : केंद्रीय मार्डच्या संपापासून बीएमसी ‘मार्ड’ दूर

मुंबई : मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतीगृहांच्या समस्यांबाबत अनेक महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही त्याबाबत राज्य सरकारकडून ठोस तोडगा काढण्यात येत नसल्याने केंद्रीय ‘मार्ड’ने बुधवारी सायंकाळपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या ‘बीएमसी मार्ड’ने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात बाधित होणार नाही.

वाचा सविस्तर...

15:46 (IST) 7 Feb 2024
दहावी, बारावीच्या परीक्षा बहिष्कारावर शिक्षण संस्था संचालक ठाम, म्हणतात…

राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 7 Feb 2024
नागपूर: २० पोलीस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी; वाहतूक शाखेलाही निरीक्षक रुजू

शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार सोडल्यानंतर शहरातील २४ पोलीस ठाण्यात ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविल्याने ठाण्यात मनमानी कारभार सुरु होता. सविस्तर वाचा…

15:37 (IST) 7 Feb 2024
वर्धा : राखीचे जीवन झाले सुखकर, डॉक्टरांनी दिले नवजीवन…

अमरावती जिल्ह्यातील माऊली जहांगीर येथील निवासी राखी रमेश भोने (वय २६) ही दुर्धर आजारामुळे बालपणापासूनच त्रस्त होती.

सविस्तर वाचा...

15:29 (IST) 7 Feb 2024
पुणे : सिंहगड रस्त्यावर धायरी फाटा परिसरात खासगी कार्यालयात आग

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात एका इमारतीतील कार्यालयात आग लागली. आगीत कार्यालयातील संगणक, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 7 Feb 2024
गडचिरोली : ‘मंगला’ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले, हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध

आज सकाळी मंगलाला घेऊन जाण्यासाठी मोठे वाहन परिसरात दाखल होताच गावकऱ्यांनी विरोध सुरू केला. ही बातमी जिल्ह्यात पसरताच पर्यटकांनी देखील संताप व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 7 Feb 2024
“आमच्यासाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत; म्हणाले, “माझा आजचा मुक्काम पारडसिंगाला…”

भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘गाव चलो अभियाना’ला सुरुवात करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस काटोल तालुक्यातील पारडसिंगा या गावी पोहोचले आहेत.

सविस्तर वाचा...

14:06 (IST) 7 Feb 2024
पुणे : पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला

पुणे : पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा...

13:48 (IST) 7 Feb 2024
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेचा पाच तालुक्यात संथपणा – मार्चअखेर कामे पूर्ण करण्याची तंबी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नांदगाव, मालेगाव, कळवण, बागलाण आणि येवला तालुक्यात लक्ष्यांकानुसार कामे झालेली नसल्याची बाब पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघड झाली. सविस्तर वाचा…

13:46 (IST) 7 Feb 2024
कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या फलकांवरून यापुढे शिवसेना नेते, पदाधिकारी बाद? भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा निर्णय

कल्याण-डोंबिवली परिसरात फलक लावताना यापुढे भाजपच्या फलकांवर शिवसेनेच्या एकाही नेते, पदाधिकाऱ्यांची प्रतीमा न लावण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सविस्तर वाचा…

13:45 (IST) 7 Feb 2024
कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन

कल्याण पूर्व भागात काही संस्थांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि समर्थक राहुल पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाचे फलक लावले आहेत. यामधील काही फलक हेतुपुरस्सर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण पूर्वेतील तिसगाव येथील घराच्या समोर लावण्यात आले आहेत. सविस्तर वाचा…

13:44 (IST) 7 Feb 2024
ठाणे: घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलांवर अखेर वाहतुक सुरक्षा घटक

घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलांच्या निर्माणानंतर मागील अनेक वर्षांपासून येथे कायमस्वरूपी धोका दर्शविणारे घटक नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत होते. अखेर उशीराने जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने धोका दर्शविणारे घटक बसविण्यास सुरूवात केली आहे. सविस्तर वाचा…

13:43 (IST) 7 Feb 2024
भाजपच्या महिला मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर?

काटोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सरपंच, सचिवांना पत्र पाठवून या मेळाव्यासाठी १०० महिलांना पाठवण्याची सूचना दिली आहे.

सविस्तर वाचा...

13:42 (IST) 7 Feb 2024
नाशिक: गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटींच्या खंडणीची मागणी – स्वीय सहायकास धमकी

शहरात संगीत महाविद्यालयासाठी प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वाडकर यांच्या स्वीय सहायकास संबंधित जागेवर जाण्यापासून अडवित दोन संशयितांनी दरगोडे बंधूंसाठी १५ तर, टोळीसाठी पाच अशी सुमारे २० कोटींच्या खंडणीची मागणी केली. सविस्तर वाचा…

13:25 (IST) 7 Feb 2024
VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती

ताडोबाच्या निमढेला बफर क्षेत्रात “भानुसखिंडी” वाघिणीची मुलगी “नयनतारा” आणि “डेडली बॉईज” हे सूर्य मावळतीला आला असतांना मस्ती करताना आढळून आले.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 7 Feb 2024
पिंपरी : मोबाईल दिला नाही म्हणून घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार

पिंपरी : मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली. अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 7 Feb 2024
Maharashtra News Live: जयंत पाटलांनी पक्षचिन्हाबाबत मांडली भूमिका

राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी तुम्ही १०-१२ लोक कोणत्या नावाने काम करणार आहात, यासाठी पक्षाचं नाव द्यायचं आहे. कदाचित ते नाव पुढेही वापरलं जाईल. त्या नावानिशी घराघरांत पोहोचण्याचं काम करायला हवं. नवीन चिन्हही घराघरांत पोहोचवायला हवं. १९९९ साली घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की घड्याळ लोकांपर्यंत पोहोचेल का? ते नवीन होतं. त्यामुळे तेव्हा घड्याळाचे प्लॅस्टिकचे बिल्ले छापून मी लहान मुलांकडे देऊन त्याचं वाटप करायचो. पण लोक आपल्यापेक्षा फार पुढे आहे. लोक चिन्ह ओळखतातच, पण नाव कुणाचं हेही ओळखतात. त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगू नका.

- जयंत पाटील, शरद पवार गटाचे आमदार

Sharad Pawar Ajit Pawar

अजित पवारांनी शरद पवारांना अनेकदा अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

Maharashtra News Today 07 February 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!