नागपूर : प्रथम मराठा समाजाने राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर नागपुरात ५ फेब्रुवारीला गोवारी समाजानेही आरक्षणासाठी एल्गार केला होता. आता हलबा समाजाकडूनही नागपुरातील संविधान चौकात १० फेब्रुवारीला आरक्षणाच्या मागणीसाठी धरणे आंदोलनातून शक्तीप्रदर्शन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हलबा, हलबी जमातीचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीने १८ डिसेंबरला नागपुरातील विधीमंडळावर मोर्चा काढला होता. यावेळी शासनाने आदिवासी हलबा समाजाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीही होत नसल्याने हलबा समाजात प्रचंड असंतोष आहे. हा रोष सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हलबा समाजाने आता १० फेब्रुवारीला संविधान चौकात धरणे आंदोलनाची घोषणा बुधवारी (७ फेब्रुवारी) केली.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

हेही वाचा : वर्धा : राखीचे जीवन झाले सुखकर, डॉक्टरांनी दिले नवजीवन…

राष्ट्रीय आदिम कृति समितीच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनात भाजपचे आमदार विकास कुंभारे, विश्वनाथ आसई, ॲड. नंदा पराते, दे. बा. नांदकर, धनंजय धापोडकर, दीपराज पार्डीकर, राजेंद्र सोनकुसरे, प्रवीण भिसीकर, अभय धकाते, भास्कर पराते, ओमप्रकाश पाठराबे, भास्कर चिचघरे, अश्विन अंजीकर, पुरुषोत्तम सेलूकर, प्रेमलाल भांदककर, राजेश बोकडेसह सर्वपक्षीय नेते व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, समाजाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

हेही वाचा : गडचिरोली : ‘मंगला’ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले, हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध

याप्रसंगी शासनाला हलबा समाजाला आरक्षणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासनाला घटना दुरूस्तीचा प्रस्ताव पाठवणे, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, हलबांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढणे, अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे , हलबा जमातीच्या बेरोजगार युवकांसाठी एक हजार कोटी रुपयांचे भाग भांडवलासह महामंडळ निर्माण करण्याची मागणी केली जाणार असल्याचेही हलबा समाजाच्या नेत्या ॲड. नंदा पराते यांनी सांगितले. या मागण्या पूर्ण करण्याचे शासनाने यापूर्वीच समाजाला आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण केले जात नसल्याने नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत असल्याचेही ॲड. पराते यांनी सांगितले.