Marathi Breaking News Live Updates, 16 October 2025: येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही महत्त्वाची पदे आणि अधिक जागा मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.

याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

13:25 (IST) 16 Oct 2025

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या...", मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शिंदे गटाच्या मंत्र्याचं विधान चर्चेत

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या मीटिंगमध्ये काय ठरले, हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये आम्ही भाजपासोबत आहोत. महायुतीतील ज्येष्ठ नेते अजेंडा ठरवून त्यावर चर्चा करतील."

13:04 (IST) 16 Oct 2025

Prashant Hiray : प्रशांत हिरे कुटुंबियांचा पाय आणखी खोलात; बँक घोटाळ्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे अडचणीत सापडलेल्या मालेगाव येथील माजी मंत्री प्रशांत हिरे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेतील १७ कोटी ७४ लाखाच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. ...सविस्तर वाचा
13:00 (IST) 16 Oct 2025

दिवाळीत फराळावर ताव, वडा-पाव मागणीत ३५ ते ४० टक्क्यांनी घट

दिवाळसणातील मिष्टान्नांची ओढ आणि सुटीसाठी गावी परतलेल्या मुलांमुळे वडा-पावच्या विक्रीत ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली असून, डिसेंबर महिना उजाडेपर्यंत व्यवसायात मंदीच राहणार असल्याचे वडा-पाव विक्रेत्या दुकानदारांचे मत आहे. ...सविस्तर बातमी
12:44 (IST) 16 Oct 2025

महिलावर्ग पाठदुखीने त्रस्त… वेळीच करून घ्या या चाचण्या

घर-ऑफिस ही तारेवरची कसरत करत असताना किंवा घरातली कामे उरकत असताना अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो. अनेकदा त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही आणि ही पाठदुखी गंभीर स्वरूपाचे दुखणे बनून जाते. अशावेळी तज्ज्ञांनी सुचविलेल्या या तपासण्या... ...सविस्तर बातमी
12:42 (IST) 16 Oct 2025

Tejas mk1A maiden flight : नाशिकमध्ये ९०० लढाऊ विमानांची निर्मिती… आता ‘तेजस एमके - १ ए’ - एचएएल नाशिकची जागतिक स्तरावर नाममुद्रा

एचएएलच्या स्थानिक सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. ...सविस्तर बातमी
12:40 (IST) 16 Oct 2025

निर्मितीचे डोहाळे

खऱ्याचा भास करून देणारी फुले, उंबरठ्याबाहेर राहून स्वागत करणारी रांगोळी किंवा दाराला सुशोभित करणारे तोरण; या सगळ्या घराला सजविणाऱ्या गोष्टी. ‘ते माझे घर, ते माझे घर, जगावेगळे असेल सुंदर’ हीच प्रत्येकाची भावना असते. स्वत:ला ते आवडत असतेच, पण इतरांच्याही नजरेतून कौतुक झिरपावे, अशी इच्छा असते. ...सविस्तर वाचा
12:14 (IST) 16 Oct 2025

"पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या दबावाखाली काम करत आहेत", ठाकरे गटाचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबण्याचा शब्द दिल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, "पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या दबावाखाली काम करत आहेत. मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीच काम करत आहेत असे वाटते"

12:14 (IST) 16 Oct 2025

गट-गणांच्या प्रारूप मतदारयादीवर २१ हरकती

जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारूप मतदारयादीवर २१ हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. ...वाचा सविस्तर
12:06 (IST) 16 Oct 2025

एक जुलैनंतरच्या मतदार नोंदणीची माहिती कुणाकडे? जिल्हा निवडणूक शाखा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकमेकांकडे बोट

जिल्ह्यात एक जुलैनंतर नव्याने किती मतदारनोंदणी झाली, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे.तर ही माहिती निवडणूक शाखेकडेच असल्याचा दावा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
11:47 (IST) 16 Oct 2025

नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना यंदा दिवाळीनिमित्त ३४,५०० हजार सानुग्रह अनुदान जाहीर !

नवी मुंबई महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना गेल्या वर्षी ३३ हजार सानुग्रह अनुदान दिले होते. ...वाचा सविस्तर
11:27 (IST) 16 Oct 2025

World Spine Day : धूम्रपानामुळे मणका होतोय खिळखिळा अन् जडतेय पाठदुखी! मणका तज्ज्ञांचा वाढत्या धोक्याबद्दल इशारा

धूम्रपानामुळे फुफ्फुसांवर होणारा घातक परिणाम सर्वांना माहिती आहेच; मात्र त्याचा दुष्परिणाम पाठीच्या मण्याक्यावरही होत असल्याचे वैद्यकीय संशोधनांतून समोर आले आहे. ...सविस्तर बातमी
11:17 (IST) 16 Oct 2025

जालना - दर्जाच्या संशयावरून २१ लाखांचे खाद्यतेल जप्त

विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जालना शहरासह जिल्ह्यातील खाद्यपदार्थ उत्पादक, मिठाई उत्पादक व विक्रेते यांची तपासणी करुन ४१ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ...वाचा सविस्तर
11:01 (IST) 16 Oct 2025

दसऱ्याच्या मुहूर्तावर महारेराची गृहप्रकल्पांना उच्चांकी मंजुरी! पुण्यात सर्वाधिक प्रकल्प

दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पातील सुधारणांच्या सुमारे ८०९ प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. ...सविस्तर बातमी
10:57 (IST) 16 Oct 2025

"महाराष्ट्रासाठी शुभ संकेत", दिपोत्सोवसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र; ठाकरे गटाची महत्त्वाची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील हिंदीसक्तीच्या विरोधात एकत्र आल्यापासून दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. अशात, आता मनसेच्या यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "दिवाळीसाठी दोन पक्ष, दोन कुटुंबं आणि दोन भाऊ एकत्र आले तर त्याचे स्वागत केले पाहिजे. राज ठाकरे यांचे मन मोठे आहे. त्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोलावले आहे. ते भाऊ आहेतच, पण त्यांनी उद्घाटनासाठी शिवसेना पक्षप्रमुखांना आमंत्रित केले आहे. हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे."

10:45 (IST) 16 Oct 2025

एकाच घरात ८१३ मतदार ?…जयंत पाटील यांच्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत

मतदार याद्यांमधील त्रुटी त्यांना दाखविण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये गैरप्रकार केले जात आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील एकाच घरात ८१३ मतदार दाखवले असल्याचे सांगितले. ...सविस्तर वाचा
10:29 (IST) 16 Oct 2025

वसईतील स्मशानभूमीची अवस्था बिकट; अंत्यसंस्कार करण्यासही अडचणी

वसई पूर्वेच्या भागात वालीव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत आजूबाजूच्या भागातील नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी येत असतात. पण गेल्या काही काळात महापालिका प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ...वाचा सविस्तर
10:29 (IST) 16 Oct 2025

शिक्षक संघटनांनी साहित्य संमेलन आयोजित करावे - आनंद भंडारी; शिक्षक बँकेच्या जलद आर्थिक व्यवहार सेवांचे उद्घाटन

जिल्हा प्राथमिक सहकारी शिक्षक बँकेच्या ॲपद्वारे 'एनईएफटी' व 'आयएमपीएस' या जलद आर्थिक व्यवहाराच्या सेवांचे उद्घाटन सीईओ भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. ...अधिक वाचा
10:29 (IST) 16 Oct 2025

अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदार यादी सदोष असल्याची तक्रार

नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी, बुऱ्हाणनगर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये हजारो मतदारांची नावे चुकीची, दुबार आहेत तसेच मृत व्यक्तींची नावे मतदारयादीमध्ये कायम असल्याचे त्यांनी पुराव्यासह देत हरकती नोंदविल्या आहेत. ...अधिक वाचा
10:28 (IST) 16 Oct 2025

प्रकाश लोंढे टोळीच्या अनधिकृत इमारतीवर बुलडोझर; महानगरपालिकेची मोठी कारवाई

गोळीबार प्रकरणात अटकेत असणारा रिपाइंचा पदाधिकारी, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीचा कारभार ज्या इमारतीतून चालतो, ती अनधिकृत इमारत गुरुवारी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यास सुरुवात करण्यात आली. ...सविस्तर बातमी
10:28 (IST) 16 Oct 2025

Diwali 2025 : दिवाळीनिमित्ताने फराळाची लगबग सुरू; घरगुती तयार फराळाला ग्राहकांची पसंती

वसई विरार शहरातही मोठ्या प्रमाणावर महिला व्यवसायिकांकडून फराळ तयार केला जातो. मुंबई, दादर, माटुंगा, अंधेरी, मिरारोडसह अगदी परदेशातही या फराळाची विक्री केली जाते. ...सविस्तर वाचा
10:28 (IST) 16 Oct 2025

मिरा भाईंदर मध्ये कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावर दुर्गंधीने नागरिक त्रस्त

मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिकांनी दिवाळी निमित्त घरांची साफसफाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जुने फर्निचर, कपडे आणि प्लास्टिक साहित्य नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला टाकले जात आहे. ...सविस्तर बातमी
10:28 (IST) 16 Oct 2025

भाईंदर : नाल्यावर उभारले 'आरोग्य वर्धिनी' केंद्र; महापालिकेचा अजब प्रकार

मिरा-भाईंदर शहरासाठी शासनाकडून एकूण ३५ आरोग्य वर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी लागणारा खर्च शासनाकडूनच उपलब्ध करून दिला जात आहे. ...सविस्तर वाचा
10:28 (IST) 16 Oct 2025

दिवाळीत आकाशात प्रकाशोत्सव, खगोलप्रेमींना विविध घडामोडींची पर्वणी

ग्रामीण भागात शेंडे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांब शेपटीच्या लेमन व स्वान या दोन आकाश पाहुण्यांचे आगमन एकत्रित होत असल्याने खगोलप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. ...सविस्तर वाचा
10:26 (IST) 16 Oct 2025

"युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार", आमदार बालाजी किणीकरांचा भाजपाला इशारा

अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. "तुम्ही युतीधर्म पाळणार नसाल, तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे", असे किणीकर म्हणाले आहेत.

10:21 (IST) 16 Oct 2025

Maharashtra Live News Update: “यंदा महापौर शिवसेनेचाच”, शिंदे गटाकडून मुंबईत बॅनरबाजी

मुंबईतील वांद्रेच्या कलानगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोट असून, त्यावर 'यंदा महापौर शिवसेनेचाच...' असा मजकूर आहे.

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स