scorecardresearch

Premium

Maharashtra News : फडणवीसांच्या ‘देवगिरी’च्या तोडीचाच अजितदादांचा ‘विजयगड’

Marathi News Today: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

Vijayagad bungalow DCM Ajit Pawar
फडणवीसांच्या ‘देवगिरी’च्या तोडीचाच अजितदादांचा ‘विजयगड’ (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

Mumbai Maharashtra Breaking News Live Today, 05 December 2023: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. पुणे महानगरपालिकेनं हा भिडेवाडा सोमवारी रात्री पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केला. आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. पण यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेज आज बीड जिल्ह्यातील परळी येथे राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवाय दक्षिण भारतात धुमाकूळ घातलेलं मिचौंग चक्रीवादळ पुढे सरकलं असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यांसह विविध महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा एकत्रित आढावा…

Uddhav Thackeray Speech
Uddhav Thackeray : “गद्दारांच्या देशा, गुंडांच्या देशा, लाचारांच्या देशा ही आता महाराष्ट्राची ओळख होत चालली आहे”
Sindhutai Daughter post
“मम्मा बघते आहेस ना..”, सिंधुताईंच्या मुलीची आईसाठी भावनिक पोस्ट
Sanjay Raut Slams BJP
“महाराष्ट्रात भाजपाच्या राजकीय कुंटणखान्याचा विस्तार, पण…”, संजय राऊत यांची टोलेबाजी
Sanjay Raut Narendra Modi (2)
“आमच्यापुढे मोठा पेच, मोदी आता…”, अशोक चव्हाणांच्या भाजपाप्रवेशावर संजय राऊतांचं वक्तव्य
Live Updates

Today’s Breaking News Updates: राज्यातील राजकारणासह हवामान आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

19:55 (IST) 5 Dec 2023
पालघर नगर परिषदेने मंजूर केली तिप्पट किंमतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची निविदा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

पालघर नगरपरिषदेने ५६ कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल ८३ लाख रुपये खर्चून कार्य आदेशाला मंजुरी दिली आहे.

सविस्तर वाचा…

19:38 (IST) 5 Dec 2023
आईच्या दुधाअगोदर प्राणवायूची गरज, म्हणून सह्याद्री देवराईची उभारणी – सयाजी शिंदे

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूसाठीच सह्याद्री देवराईची स्थापना आपण केली असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

सविस्तर वाचा…

19:25 (IST) 5 Dec 2023
अधिवेशनापूर्वीच आमदार निवासांतील वीज पुरवठा खंडित, अधिकारी म्हणतात…

अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाचीच वीज खंडित झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सविस्तर वाचा…

19:11 (IST) 5 Dec 2023
इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

रिझर्व्ह बँकेने नूतन बँकेसाठी सर्व प्रकारचे व्यवहार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असल्याने भाजप, संघ परिवाराशी निगडित या बँकेचे अस्तित्व कायमचे लयाला गेले आहे.

सविस्तर वाचा…

19:05 (IST) 5 Dec 2023
सोलापूर : बाल निरीक्षणगृहातील पाच मुलांचे अपहरण की पलायन ?

ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी पाच मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सविस्तर वाचा…

18:15 (IST) 5 Dec 2023
म्हैसाळ योजनेच्या व्हॉल्व्ह खरेदीत कोट्यावधीचा डल्ला मारण्याचा डाव- डॉ. कांबळे

सांगली : म्हैसाळ योजनेच्या टप्पा तीन व चारमध्ये पाण्याचे व्हॉल्व बसविण्यासाठी शासन मान्य दूरसुचीपेक्षा चार पट दराने खरेदी करून कोट्यावधी रुपये हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केला. निविदा मॅनेज करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दोन महिन्यांत चार कार्यकारी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

18:13 (IST) 5 Dec 2023
पालघर : डिसेंबर उजाडला तरीही भात खरेदी नाही, शेतकरी अर्थिक अडचणीत

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी भात हे एकमेव पीक खरिप हंगामात घेत असतात. येथील ८० टक्के शेतकरी हे निव्वळ भात या पिकातून मिळाणाऱ्या उत्पादनातून वर्षभर आपला संसाराचा गाडा चालवत असतात, मात्र भाताचे पीक हाती येऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला तरी या भाताची आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केली जात नसल्याने येथील शेतकरी अर्थिक अडचणीत आला आहे.

सविस्तर वाचा…

18:11 (IST) 5 Dec 2023
जरांगे पाटलांच्या मार्गावर गोमूत्र शिंपडले….चले जावच्या घोषणा!

सकल ओबीसी समाज बांधवानी मनोज जरांगे पाटील यांना काळे झेंडे दाखवीत, रस्त्यावर गोमूत्र शिंपडून निषेध व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

17:31 (IST) 5 Dec 2023
‘लालपरी’ गरम झाल्याने बंद पडली…विद्यार्थ्यांनी बाटलीने पाणी आणून सुरू केली!

वाहक व चालकाला विचारले असता, ‘गाडी गरम झाल्याने बंद पडली’ असे उत्तर त्यांनी दिले.

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 5 Dec 2023
आरोग्य उपसंचालक न्यायालयात ‘हाजिर हो…’ वाचा काय आहे प्रकरण?

नागपूर: नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

सविस्तर वाचा…

17:05 (IST) 5 Dec 2023
नवी मुंबईत सोनसाखळी चोरांची दहशत वाढतेय

पनवेल: चोर चालत आला. त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली अन् कोणतीच भिती न बाळगता स्वतःच्या दुचाकीपर्यंत चालत गेला. काही क्षणात महिलेला काही समजण्याआत तो उभ्या केलेल्या दुचाकीवरुन फरार झाला. या चोरीत चोरट्याने महिलेचे एक लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविले. ही घटना सोमवारी साडेसात वाजता खारघरमधील सेक्टर २१ येथील सेंट्रल पार्कजवळच्या रस्त्यावर घडली. 

वाचा सविस्तर…

16:58 (IST) 5 Dec 2023
फडणवीसांच्या ‘देवगिरी’च्या तोडीचाच अजितदादांचा ‘विजयगड’

नागपूर: नागपूरला दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. त्यासाठी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्थेची सोय आहे.

सविस्तर वाचा…

16:38 (IST) 5 Dec 2023
मंत्रीपदासाठी आता देवाला कौल लावायचाच बाकी राहिलाय, कोण म्हणतंय जाणून घ्या

अलिबाग- सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहिला असेल तर तोही करावा लागेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केले. ते महाड येथे पत्रकारांशी बोलत होते. मला अजूनही मंत्रीपदाची आशा असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली.

सविस्तर वाचा…

16:33 (IST) 5 Dec 2023
हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुषखबर; राज्य सरकार देणार वर्षभरात एवढी घरे

येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत तब्बल एक लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊ, असे गृहनिर्माण मंत्री सावे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

16:22 (IST) 5 Dec 2023
खोदकामापूर्वी सरकारी यंत्रणांना या प्रणालीवर करावी लागणार नोंदणी

नागपूर: विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणेला विविध ठिकाणी खोदकाम करावे लागते. ते करताना त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या इतर सुविधांना हानी पोहोचते.

सविस्तर वाचा…

16:19 (IST) 5 Dec 2023
राज्य मागासवर्ग आयोगाबाबत बहुजन कल्याण मंत्री सावे यांचे मोठे विधान : म्हणाले, ‘मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित होते, तसे काम…’

राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुण्यात मराठा आरक्षण आणि राज्य मागासवर्ग आयोगाबाबत मोठे विधान केले आहे.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 5 Dec 2023
मुंबई : दहिसरमध्ये जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी

मुंबई : दहिसर येथील हरेम टेक्स्टाईलसमोर टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे टोलनाका परिसरात पाणी साचले असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 5 Dec 2023
पुणे : दूध दरवाढीच्या मागणीसाठी पुण्यात सदाभाऊ खोत यांचा कावड मोर्चा

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील लाल महाल ते कुमठेकर रोडवरील दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयावर कावड मोर्चा काढला. या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 5 Dec 2023
भंडारा: प्रसुतीपश्चात महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप

भंडारा: प्रसुतीपश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांच्या निष्कळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यरात्रीपर्यंत आंदोलन सुरू होते.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 5 Dec 2023
‘आळंदी बंद’ अखेर मागे, ग्रामस्थांचा मोर्चा; “वारकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही” – नवनिर्वाचित विश्वस्त राजेंद्र उमाप

सकाळी मोर्चा काढून झाल्यानंतर आळंदी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आळंदी ग्रामस्थ हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 5 Dec 2023
विश्वस्त निवडीत डावलल्याने आळंदीकरांचा निषेध मोर्चा, वारकऱ्यांची गैरसोय

तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांनी आज बंदचे आवाहन केले.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 5 Dec 2023
मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे राजीनामा देण्याच्या तयारीत?

मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:04 (IST) 5 Dec 2023
बुलढाणा: एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

बुलढाणा: भरधाव मालवाहू वाहन व महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 5 Dec 2023
आंतरराज्य जनावरे तस्करी; १० जणांविरुद्ध गुन्हा

यवतमाळ: कत्तलीसाठी चारचाकी वाहनासह पायदळ होत असलेल्या आंतरराज्यीय जनावर तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या दोन कारवाईत ३३ जनावरांची सुटका करून १० गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 5 Dec 2023
पालघर : अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शाळांतील अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पालघर येथे आज आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये पालघर जिल्ह्यातील १६ शाळांतील २९३ अपंग विद्यार्थी सहभागी झाले होते.

13:39 (IST) 5 Dec 2023
‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले

पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत.

सविस्तर वाचा…

13:33 (IST) 5 Dec 2023
पालघर : वृद्ध महिलेच्या गळ्यातून चैन चोरणाऱ्याला अटक

डहाणू : चिंचणी आंबेवाडी येथे वृद्ध महिलेच्या घरात शिरून गळ्यातली सोन्याची चैन पळवणाऱ्या चोरट्याला वाणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एकाच गावातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीकडून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

13:32 (IST) 5 Dec 2023
मनमाडकरांना पालखेड आवर्तनाची प्रतीक्षा, सध्या २२ दिवसाआड अनियमित पाणी पुरवठा

मनमाड : पालखेड धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन मनमाड शहराला कधी मिळते, याकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे. दोन-तीन दिवसांत ते अपेक्षित आहे. त्यामुळे शहराची पाणी टंचाई काही प्रमाणात तरी कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर…

13:31 (IST) 5 Dec 2023
पाणवठे नष्ट व कोरडे झाल्याने उरणमध्ये येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची संख्या रोडावली?

उरण : विकासाच्या नावाने उरणच्या परिसरातील नैसर्गिक पाणथळीची ठिकाणे नष्ट होऊ लागल्याने नोव्हेंबर ते एप्रिल, मे या कालावधीत विविध देशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगोसह इतरही जातींच्या पक्ष्यांच्या संख्येत ही घट झाली आहे. ही घट लक्षणीय असून या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्ष्यांपैकी आता त्यांची संख्या शेकड्यावर आली आहे. असा दावा पर्यावरवाद्यांनी केला आहे.

वाचा सविस्तर…

13:16 (IST) 5 Dec 2023
७ डिसेंबरपासून खासदार-आमदारांना गावबंदी कशासाठी?

नागपूर: सोन्याची कुऱ्हाड असलेला विदर्भ गरीब का झाला, असा प्रश्न विचारून पालकमंत्री तथा सर्व पक्षीय खासदार, आमदारांना ७ डिसेंबरपासून गावबंदी करण्यात येत आहे, अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

सविस्तर वाचा…

13:15 (IST) 5 Dec 2023
मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केले होते.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 5 Dec 2023
पालघर : अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शाळांतील अपंग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पालघर येथे आज आयोजित करमुक्त आल्या होत्या. यामध्ये पालघर जिल्हयातील १६ शाळांतील २९३ अपंग विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा परिषद पालघर अर्थसंकल्प तरतूद पाच टक्के अपंग कल्याण सेस योजने अंतर्गत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यात सात अनुदानित व नऊ विनाअनुदानित अशा १६ शाळांमध्ये ८२६ अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अपंग दिनाचे औचित्य साधून मतिमंद, कर्णबधिर, अंध व बहुविकलांग अशा प्रवर्गानुसार धावणे, गोलाफेक, चेंडू फेक, चालणे, बादलीत चेडू फेकणे, लगोरी व बुद्धिबळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

13:03 (IST) 5 Dec 2023
प्लास्टिकच्या फुलांमुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत; हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे करणार ‘ही’ मागणी

पुणे : फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध गावांना खासदार सुळे भेट देत आहेत. कोपरा सभा, विकासकामांची उद्घाटन त्यांच्या हस्ते करून निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

12:55 (IST) 5 Dec 2023
चक्क स्मशानभूमीत आंदोलन; कारण काय…

वर्धा: प्रश्नांकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असेल तर समस्या विविध मार्गे वेशीवर टांगण्याचे काम आंदोलक करीत असतात.

सविस्तर वाचा…

12:51 (IST) 5 Dec 2023
भुसावळ विभागात तब्बल १ लाख फुकटे प्रवासी! रेल्‍वेत विना तिकीट प्रवास…

रेल्‍वेमधील सोयी-सुविधांबाबत प्रवाशांची ओरड सुरू असतानाच दुसरीकडे, विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्‍वे प्रवाशांच्‍या संख्‍येत वाढ होताना दिसत आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 5 Dec 2023
मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहुल लागली होती. मात्र, मुंबईसह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. चार – पाच दिवसांनंतर राज्यातील अवकाळी पाऊस थांबला असला तरी त्यानंतर मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २ ते ४ डिसेंबरदरम्यान मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या. परिणामी, मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 5 Dec 2023
चिंता वाढली! पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; गोंदिया जिल्ह्यात आत्तापर्यंत १२०० हेक्टरवर नुकसान

गोंदिया: मागील महिन्यात पारा घसरून थंडीचा जोर चढत चालला होता. आज, मंगळवारी पुन्हा आकाशात ढग जमले. पहाटे पावसाची रिपरिप देखील सुरू झाली होती.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 5 Dec 2023
लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या स्थानावर

नागपूर: राज्यात महिलांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर उत्तरप्रदेश तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो, ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जारी केलेल्या अहवालावरून समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 5 Dec 2023
ठाणे : अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा वाशीत, ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजन

ठाणे – अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा नवी मुंबईतील वाशी उपनगरात आयोजित करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, वाशी या दोन संस्थांच्या पुढाकाराने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत वाशी येथील साहित्य मंदिर येथे पार पडणार आहे.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 5 Dec 2023
सिंधुताई सपकाळांचा वारस होण्‍याचा खासगी सचिवाचा प्रयत्‍न; सिंधुताईंचे पुत्र अरूण सपकाळ यांचा आक्षेप

अमरावती: दिवंगत सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांच्‍या खासगी सचिवाने स्‍वत:च्‍या नावामागे सिंधुताईंचे नाव लावून त्यांचा वारस होण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे, असा आक्षेप सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरूण सपकाळ यांनी घेतला आहे. या प्रकरणी त्‍यांनी अचलपूर येथील न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 5 Dec 2023
ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील डॉ. प्रवीण देवकाते गजाआड

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक करण्यात आली होती.

वाचा सविस्तर…

11:53 (IST) 5 Dec 2023
बांगडीचे लटकन खेळताना चुकून लहान मुलीच्या नाकातून थेट फुफ्फुसात… डॉक्टरांनी दिले जीवदान

पुणे : बांगडीला असलेले लटकन खेळताना चुकून तीन वर्षांच्या मुलीच्या नाकातून थेट फुप्फुसात गेले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर ब्रॉन्कोस्कोपी करून श्वसननलिकेला इजा न होता ती वस्तू बाहेर काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवले आहे.

वाचा सविस्तर…

11:52 (IST) 5 Dec 2023
आज विदर्भासह मराठवाड्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना “यलो अलर्ट”

नागपूर: बंगालच्या उपसागरातील “मिचॉंग” चक्रीवादळामुळे तामिळनाडू व आंध्रप्रदेशच नाही तर महाराष्ट्र देखील कमीअधिक प्रमाणात प्रभावित होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 5 Dec 2023
गोखलेनगर भागात गुंडांची दहशत; तलवारी उगारुन दुकानांची तोडफोड

पुणे : शहरात कोयते, तलवारी उगारुन गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात तलवारी उगारुन गुंडांनी तीन दुकानांची तोडफोड केली. गुंडांनी एकावर तलवारीने एकावर वार केले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली.

वाचा सविस्तर…

11:51 (IST) 5 Dec 2023
कार्तिक यात्रेनिमित्त नगर रस्त्यावरुन आळंदीकडे जाणारी जड वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (कार्तिक यात्रा) श्री क्षेत्र आळंदी येथे राज्यभरातून वारकरी बांधवांची दर्शनासाठी गर्दी होते. कार्तिक यात्रेनिमित्त नगर रस्त्यावरील मरकळ येथून आळंदीकडे जाणााऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

11:50 (IST) 5 Dec 2023
दुकान, आस्थापनांचे नामफलक मराठीत न केल्यास दंड, नाशिक महापालिकेचा इशारा

नाशिक- दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांवरून मनसेने आंदोलन केल्यानंतर महापालिकेने शहरातील सर्व दुकाने आणि आस्थापनाधारकांना नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य असल्याचे सूचित केले आहे. ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत आढळून येणार नाहीत, त्यांच्यांवर न्यायालयाच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे. प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासन निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत नसल्याची भावना राजकीय वर्तुळात उमटत आहे.

शहरात अनेक आस्थापनांचे फलक मराठीव्यतिरिक्त अन्य भाषेतही आहेत. या मुद्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. घाईघाईत आस्थापनांवरील नामफलकाविषयी निवेदन देण्यात आले. न्यायालयीन निर्णय व उद्योग विभागाच्या राजपत्रान्वये प्रादेशिक अधिकार क्षेत्रात प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, अशा आस्थापनांकडे मराठी देवनागरी भाषेसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील. परंतु, अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

या अधिनियमानुसार महापालिका क्षेत्रांतील सर्व दुकाने व आस्थापनाधारकांना त्यांच्या दुकानांवरील आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. ज्या आस्थापनांचे फलक मराठी भाषेत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरातील सर्व दुकानदार, वाणिज्यिक संस्था, हॉटेल आदींनी आपापले नामफलक मराठीत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या आस्थापनांचे फलक मराठी भाषेत नसतील, अशा आस्थापनांना प्रति कर्मचारी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व दुकाने व आस्थापनाधारकांनी आपले नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांनी केले आहे.

11:46 (IST) 5 Dec 2023
पुण्यातील गृहनिर्मितीसाठी ७० हेक्टर जागा द्यावी, म्हाडाची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा म्हाडाच्या पुणे मंडळाचा मानस आहे. आतापर्यंत मंडळाला गृहनिर्मितीसाठी ७२३ हेक्टर जागा उपलब्ध झाली होती. यातील ५९२ हेक्टर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात आला असून उर्वरित जागेवर बांधकाम सुरू आहे. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी ७० हेक्टर जागेचा शोध घेतला असून ही जागा म्हाडाच्या पुणे मंडळाला उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

11:44 (IST) 5 Dec 2023
चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या या गाड्या रद्द

नागपूर: मिचाँग चक्रीवादळामुळे रेल्वेने ११४ गाड्या रद्द केल्या असून नागपूरमार्गे धावणाऱ्या ३५ हून अधिक रेल्वेगाड्यांचा त्यात समावेश आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतात धडकलेल्या चक्रीवादळाने चेन्नईसह लगतच्या भागात हाहाकार उडवला आहे.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 5 Dec 2023
“बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या”; राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचं उत्तर, म्हणाले, “जनादेश…”

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे. तर तेलंगणात काँग्रेसने विजय मिळवला. या विधानसभा निवडणूक निकालावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. लोकांच्या मनात शंका असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हवी, अशी मागणी राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी

11:32 (IST) 5 Dec 2023
“…तर संपूर्ण पक्ष भाजपाबरोबर गेला असता”; रोहित पवारांचं मोठं विधान, अजित पवारांचा दावा फेटाळत म्हणाले…

भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची इच्छा शरद पवारांची होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. पण शरद पवारांनी अजित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी मला पहिल्यांदाच समजत आहेत, असं पवारांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी

michaung cycloneमिचौंग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra news live political news maratha reservation marathi batmya weather update today 05 december 2023 rmm

First published on: 05-12-2023 at 11:30 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×