scorecardresearch

Premium

मनमाडकरांना पालखेड आवर्तनाची प्रतीक्षा, सध्या २२ दिवसाआड अनियमित पाणी पुरवठा

दिवाळीनंतर हवामान बदलल्याने मनमाड शहराची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली. अनेक भागांमध्ये २० ते २२ दिवसांआड अनियमित व अपुरा पाणीपुरवठा नगरपालिकेच्या नळांद्वारे सुरू आहे

Manmadkars waiting for Palkhed cycle currently irregular water supply after every 22 days
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात सध्याच्या वितरण व्यवस्थेत जेमतेम डिसेंबरअखेर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : पालखेड धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन मनमाड शहराला कधी मिळते, याकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे. दोन-तीन दिवसांत ते अपेक्षित आहे. त्यामुळे शहराची पाणी टंचाई काही प्रमाणात तरी कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Limited sources of water supply to cities in Thane district
ठाणे जिल्ह्यतील शहरांपुढे भविष्यातील ‘जलचिंता’
Gondia, Tragic Accident, Car Veers, Canal, Three Killed, Pangaon, Salekasa,
गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
increase in temperature Prediction negative impact wheat production farmer
गहूउत्पादक शेतकरी अडचणीत? संभाव्य तापमानवाढीचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता
Industry in Chakan
पिंपरी : चाकणमधील उद्योग बाहेर जाण्याच्या पवित्र्यात? काय आहे नेमके कारण?

दिवाळीनंतर हवामान बदलल्याने मनमाड शहराची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली. अनेक भागांमध्ये २० ते २२ दिवसांआड अनियमित व अपुरा पाणीपुरवठा नगरपालिकेच्या नळांद्वारे सुरू आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात सध्याच्या वितरण व्यवस्थेत जेमतेम डिसेंबरअखेर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

आणखी वाचा-नाशिक : वाहतुकीत अडथळ्यामुळे दुकानदार, फळ विक्रेत्यांविरुध्द गुन्हा

अशा गंभीर परिस्थितीत या आठवड्यात सुटणारे पालखेडचे आवर्तन हा एकमेव दिलासा ठरणार आहे. त्यावरच शहरातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. सध्याचे हे पालखेडचे आवर्तन निफाड, येवला भागातील पिकांसाठी तर मनमाड-येवला आणि रेल्वेच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणार आहे. मात्र असे असले तरी आणखी काही महिने करंजवण योजना पूर्ण होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे किमान यावर्षी तरी वागदर्डी धरण न भरल्याने शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम आहे. त्यातच रब्बीचे पालखेडचे आवर्तन लांबत चालले आहे. त्यामुळे मनमाडकरांचीही चिंता वाढत चालली आहे.

आणखी वाचा-हुद्यांच्या नावात बदल केल्यास अडसर

करंजवणचे काम ६५ टक्के पूर्ण

मनमाडसाठी सध्या करंजवण-मनमाड जलवाहिनी योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यातील जलवाहिनी, जलशुध्दीकरण प्रकल्प उभारणी आदी कामे जवळपास ६५ ते ७० टक्के पूर्ण होत आली आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध झालेला आहे. ही योजना कधी पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणात सध्या मृत साठ्यातील पाणी शिल्लक असून ते डिसेंबरअखेरपर्यंत पुरू शकते. दोन, तीन दिवसात सुटणार्या पालखेडच्या आवर्तनाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. -शेषराव चौधरी ( मुख्याधिकारी, मनमाड नगरपालिका)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manmadkars waiting for palkhed cycle currently irregular water supply after every 22 days mrj

First published on: 05-12-2023 at 13:13 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×