Maharashtra Maratha Reservation Protest Updates: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. सुरुवातीला त्यंना फक्त २९ ऑगस्ट या एका दिवसासाठीच परवानगी मिळाली होती. पण त्यांना आंदोलनासाठी आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाले आहे. दरम्यान जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Potest Live Breaking News Update : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासह राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

21:44 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: समन्वयने प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू; मराठा आंदोलनावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "शिंदे समितीने आज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सरकार समन्वयाने प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी चर्चा सुरू केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि ११ जणांची एक समिती आहे. ते त्या संदर्भात चर्चा करत आहेत."

21:16 (IST) 30 Aug 2025

मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत येत असताना शनिवारी विजय घोगरे या आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...वाचा सविस्तर
20:58 (IST) 30 Aug 2025

मराठा आंदोलनात चित्रा वाघ यांची प्रतिकात्मक बाहुली चर्चेत; जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेचा राग

मराठा आंदोलनामध्ये सर्वात लक्षवेधी ठरली ती भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांची प्रतिकात्मक बाहुली. चित्रा वाघ यांनी मराठा आंदोलन आणि नेते जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेमुळे मराठा आंदोलक चांगलेच संतापले आहेत. ...सविस्तर वाचा
20:57 (IST) 30 Aug 2025

मराठा आंदोलनात चित्रा वाघ यांची प्रतिकात्मक बाहुली चर्चेत; जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेचा राग

मराठा आंदोलनामध्ये सर्वात लक्षवेधी ठरली ती भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांची प्रतिकात्मक बाहुली. चित्रा वाघ यांनी मराठा आंदोलन आणि नेते जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेमुळे मराठा आंदोलक चांगलेच संतापले आहेत. ...सविस्तर वाचा
19:49 (IST) 30 Aug 2025

अवघ्या १० रुपयांत मिळवा रेल्वे स्थानकातील सुविधा; मराठा आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज प्रसारित

मराठा आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर एक संदेश व्हायरल होत आहे. यामध्ये आंदोलकांनी केवळ १० रुपयाचे रेल्वेचे परतीचे तिकिट काढावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
19:49 (IST) 30 Aug 2025

अवघ्या १० रुपयांत मिळवा रेल्वे स्थानकातील सुविधा; मराठा आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज प्रसारित

मराठा आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर एक संदेश व्हायरल होत आहे. यामध्ये आंदोलकांनी केवळ १० रुपयाचे रेल्वेचे परतीचे तिकिट काढावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
19:41 (IST) 30 Aug 2025

मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मिळाली आणखी एका दिवसाची परवानगी

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे.

18:56 (IST) 30 Aug 2025

Ajit Pawar : मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडलेत? अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर बातमी
18:14 (IST) 30 Aug 2025

Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या वाहनांमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी.., मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबई मार्गिकेवर वाहनांच्या रांगा

वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असतानाही उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मराठा आंदोलक ठाणे मार्गे मुंबईत जात होते. ...सविस्तर वाचा
18:05 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan :जरांगेच्या आवाहनानंतर साडेचार तासानंतर वाहतूक कोंडी फुटली; मराठा आंदोलकांनी केला रस्ता मोकळा

त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केल्यानंतर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आंदोलक बाजूला झाल्याने अखेर साडेचार तासांनंतर वाहतूक कोंडी फुटली. ...सविस्तर बातमी
17:46 (IST) 30 Aug 2025

वीज पुरवठा खंडीत झाल्याने टिएमटी बस वाहतूकीवर परिणाम; १२३ पैकी १७ विद्युत बसगाड्या प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टिएमटी) ताफ्यात ४५३ बसगाड्या असून त्यापैकी ३६३ बसगाड्या प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध होत आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
17:35 (IST) 30 Aug 2025

गणेशोत्सवाच्या धामधुमीत शिळफाटा रस्त्यावरील ईगो बारवर छापा, बारबालांसह ५६ जणांवर गुन्हे

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत असलेला ईगो बार(मे. हाॅटेल टुरिस्ट आणि बार) रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. ...अधिक वाचा
17:28 (IST) 30 Aug 2025

गडकरी रंगायतनची कोनशिला दर्शनी भागात बसवा अन्यथा आंदोलन करू... शिवसेना नेते राजन विचारे यांचा प्रशासनाला इशारा

२५ ऑक्टोंबर १९७४ रोजी राम गणेश गडकरी रंगायतनचे भूमिपूजन झाले तर १५ डिसेंबर १९७८ रोजी राम गणेश गडकरी रंगायतनचे लोकार्पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. ...वाचा सविस्तर
17:26 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलकांना प्रशासनाचा मोठा दिलासा; मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची धावपळ कमी होणार

रविवारी मेगाब्लाॅक घेतला असता तर वाशी एक्झिबिशेन सेंटर वा इतर ठिकाणाहून आझाद मैदानावर येणार्‍या मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली असती. ...सविस्तर वाचा
17:06 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलकांचे अन्न - पाणी बंद केल्याचा पालिकेवर आरोप; महापालिकेने आरोप फेटाळले

आंदोलकांचे खाणेपिणे बंद केल्याचाही आरोप होत असून मनोज जरांगे यांनी सुविधा पुरविण्याचे काम मुंबई महानगरपालिकेचे आहे. मात्र हे काम ते पार पाडत नसल्याचाही आरोप केला आहे. पालिकेने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ...वाचा सविस्तर
16:56 (IST) 30 Aug 2025

मोतीलाल नगरमधील रहिवाशांना वाढीव सेवाशुल्क...

२०२१ ते २०२३ पर्यंतच्या सेवाशुल्काच्या थकबाकीच्या देयकांनी रहिवाशी हवालदिल झाले आहेत. वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याची मुंबई मंडळाकडे मागणी... ...अधिक वाचा
16:45 (IST) 30 Aug 2025
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: "मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत", भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मी पुन्हा तेच सांगेन की, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या आहेत त्या मान्यच होऊ शकत नाहीत. मान्य होणाऱ्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आता का हट्ट सरू आहे आणि का हे सर्व लांबवले जात आहे कळत नाही."

16:40 (IST) 30 Aug 2025

डोंबिवलीत राज ठाकरेंविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कामगाराला मनसेच्या दणक्याने कॅफेतून काढले

मनसे पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव सुरू आहे. वाद नको म्हणून समंजसपणे कॅफेत जाऊन दुकानातील क्षेत्रीय व्यवस्थापकाला समजावले. ...सविस्तर वाचा
16:36 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मनोज जरांगेच्या आंदोलनाचा क्रॉफर्ड मार्केट आणि आसपासच्या व्यावसायिक परिसराला फटका

मुंबईत मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असल्यामुळे लाखो लोक मुंबईत दाखल होत आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून, क्रॉफर्ड मार्केट आणि आसपासच्या व्यावसायिक परिसरात याचे आर्थिक परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. बादशाह कोल्ड ड्रिंक आणि पीके वाईन्ससह प्रतिष्ठित स्टोअर्स लवकर बंद करण्यात आले. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

16:31 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Azad Maidan : "मराठा आरक्षण मिळू दे"; लालबागच्या राजाला मराठा आंदोलकांचे साकडे

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : आंदोलकांनी ‘मराठा आरक्षण मिळू दे असे साकडे लालबागच्या राजाच्या चरणी केल्याची माहिती मराठा आंदोलक गजानन होसबे यांनी दिली. ...वाचा सविस्तर
16:31 (IST) 30 Aug 2025

Mumbai Traffic Updates: तीन ते चार तासांपासून दक्षिण मुंबईत मोठी वाहतूक कोंडी

गेल्या तीन ते चार तासांपासून दक्षिण मुंबईत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ईस्टर्न फ्रीवे आणि जेजे फ्लायओव्हरवरील प्रवाशांना प्रवासासाठी बराच विलंब होत आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी रस्ते रोखणे सुरूच ठेवले आहे, ते मार्ग मोकळा करण्यास नकार देत आहेत, त्यामुळे मुंबईकर आणि दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

16:28 (IST) 30 Aug 2025
Mumbai Traffic Updates: आंदोलनाचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम

मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राज्यभरातून लाखो लोक दाखल होत आहेत. अशात याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

https://twitter.com/ANI/status/1961725216721449314

16:18 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मराठा आंदोलक-बीएमसीमध्ये आरोप प्रत्यारोप

आझाद मैदानात सुविधा कमी असल्याचा मराठा आंदोलकांचा दावा, बीएमसीने नाकारला असून, आंदोलनस्थळी पुरेशी व्यवस्था केली असल्याचे म्हटले आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनासाठी जमलेल्या आंदोलकांना मूलभूत सुविधांचा अभाव आणि कार्यक्रमस्थळी पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती.

16:16 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: आंदोलकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा: बच्चू कडू

सरकार राजकारण करत असेल तर ते चुकीच आहे. समाजातील एकोपा तोडण्याचं काम सरकार व्यवस्थित करीत आहे. देशातील समाजामध्ये असलेला एकोपा तोडून आपली राजकीय पोळी शिकण्याचा काम भाजपा करत आहे. कोणी आंदोलन करत असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा. आंदोलन हे लोकशाहीने दिलेलं मोठ शस्त्र आहे. आंदोलकांना शत्रू न समजता त्यांना कसं समोर जाता येईल हे सरकारने बघायला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

16:07 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मराठा आंदोलकांची कोंडी करण्यासाठी अन्न व पाण्याला शस्त्र बनविणे अमानवीय: अजित नवले

मराठा आंदोलकांना जेवण व पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेच केले जात आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार आहे, असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे अन्न आणि पाण्यापासून आंदोलकांची कोंडी करायची. सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय ती अमानवीय कृती सुद्धा आहे, अशी टीका माकपचे शेतकरी नेते अजित नवले टीका केली आहे.

15:54 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मराठा आरक्षणासाठी हैदराबाद, सातारा गॅझेटचे कायद्यात रूपांतर करा: मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद, सातारा गॅझेटचे कायद्यात रूपांतर करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडे केली आहे.

15:40 (IST) 30 Aug 2025

कल्याणमध्ये समोसा विक्री दुकानात रोखून बघण्यावरून तरूणांमध्ये हाणामारी

कल्याण पूर्व भागात शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर दोन तरूणांच्या जोरदार हाणामारीत होऊन तक्रारदार तरूणाचा हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे. ...सविस्तर बातमी
15:38 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मराठा आरक्षणाबाबत शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट; प्रदेशाध्यक्ष म्हणाले, "आता पूर्वीसारखा..."

मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून मागत असलेल्या आरक्षणाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, "आरक्षण मिळावे ही केवळ राष्ट्रवादीचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची भूमिका आहे. मराठा समाज आता पूर्वीसारखा मोठा राहिला नाही. विभाजन झाले आहे, अल्पभूधारक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे येवढीच मागणी आहे."

15:33 (IST) 30 Aug 2025

मुंबई : रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द; गणेशभक्तांना दिलासा

शनिवारी दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली केली. ...सविस्तर बातमी
15:32 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: ‘…तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो’, शरद पवारांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान; तामिळनाडूचा दिला दाखला

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी राज्य सरकारच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान, आता मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे. तामिळनाडूत आरक्षण वाढू शकतं तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल उपस्थित करत घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सविस्तर वृत्त...

जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.