Mumbai Maharashtra News Highlights: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज (०५ जून) लोकार्पण होणार आहे. इगतपुरी ते आमणे या ७६ किमी मार्गाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील पाच खासदार शिवसेनेच्या (शिंदे) संपर्कात असल्याची चर्चा चालू असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसू शकतो असा दावा केला जात आहे. तर, पक्षातून आउटगोइंग थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केल्याचं देखील बोललं जात आहे.
येत्या ९ जूनपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू करणार असून ‘लढा आपल्या मुंबईचा’ अशी शिवसेनेची टॅगलाइन आहे. दरम्यान, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्य चालू असल्याचा दावा शिवसेनेने (ठाकरे) ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून केला आहे. “मिंथ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे. कारण अजित पवारांनी अनेकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या असून ते कासाविस झाले आहेत”, असं सामनामध्ये म्हटलं आहे. यावर आज वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ शकतात. यासह राज्यातील व देशातील राजकीय बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Today : महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय व सामाजिक घटनांचा तथा बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
मुंबईच्या मिठी नदीचा गाळ टाकला जातोय दिव्यात - ठाकरे गटाच्या आरोपामुळे खळबळ
तालुका क्रीडा संकुलाची होणार पुनर्बांधणी; पडझडीनंतर २५ कोटींतून होणार उभारणी, दोन वर्षांपूर्वी झालेली पडझड
संत निवृत्तीनाथ पालखीचे १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान
भटक्या श्वानांची रस्त्यांवर दहशत कायम; पालिकेची श्वान निर्बिजीकरण मोहिम संथगतीने
नाशिक ते मंत्रालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा
Samruddhi Mahamarg: फक्त मुंबई ते नागपूर नाही, तर समृद्धी महामार्गावरून या २५ ठिकाणीही जाता येणार; ७०१ किमीमध्ये आहेत २५ इंटरचेंज!
चर्चगेट स्थानकात भीषण आग; दुकान आगीत भस्मसात
चर्चगेट स्थानकातील केकच्या दुकानाला आग लागली आहे. स्थानकातून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट येत असून अग्निशमन दलाचे पथक रवाना झाले आहे.
सीमेंट काँक्रीट रस्ते, मेट्रोच्या कामांमुळे कल्याण, डोंबिवलीतील रस्ते जलमय
कल्याण शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्या ९२ चालकांवर फौजदारी गुन्हे
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण, संपूर्ण ७०१ किमी मार्ग लोकांच्या सेवेत दाखल
"आमची गाडी छान चालली आहे; तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवतो", समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी
Samruddhi Highway Inauguration : "देवेंद्र फडणवीसांनी ड्रायव्हिंंग सुरू करताच स्पीड...", अजित पवारांनी सांगितला समृद्धी मार्गावरील किस्सा
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना; २० टक्के घरांना निवासयोग्य दाखला बंधनकारक
अदानीला २१ एकर जागा देता यावी म्हणूनच अटी शिथिल; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
नाशिकमध्ये ठाकरे गटाची अधोगती कशामुळे ?
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक गुलाबराव वाघ आता ठाकरे गटाचे उपनेते
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री इगतपुरीत दाखल
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री इगतपुरीत दाखल झाले आहे. आमणे ते इगतपुरी असा चौथा टप्पा आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांनी नव्या रस्त्यावरून कारने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे.
"अन्यथा लक्ष्मण हाकेंना निपटवून टाकू", राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
लक्ष्मण हाकेंनी आठ दिवसांत अजित पवार यांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिला आहे. त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही त्यांना निपटवून टाकू, असंही पवार म्हणाले. तसेच हाके हे हाकी ओबीसी नेते नाहीत असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
"रोज सकाळी उठून कोणाला फसवताय?", शिवसेना उबाठा-मनसे युतीच्या वक्तव्यांवरून अमित ठाकरेंचा राऊतांना टोला
"... तर आम्ही कोणताही त्याग करायला तयार", मनसेबरोबर युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं पऊल; पडद्यामागे चाललंय काय?
ठाकरेंचे पाच आमदार शिंदेंच्या संपर्कात? पावसाळी अधिवेशनात धक्का बसणार? संजय राऊत म्हणाले...
शिवसेनेतील (ठाकरे) पाच खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची अफवा उडाली आहे. काही वृत्तवाहिन्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबतच्या बातम्या देत आहेत. तर काही वृत्तवाहिन्यांनी शिवसेनेतील (शिंदे) नेत्यांचा (नामोल्लेख टाळत) हवाला देत हाच दावा केला आहे. यावर आता शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, "या खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. मुळात तुम्हा प्रसारमाध्यमांना अशी माहिती कोण देतंय? मी जर म्हटलं की शिंदेंचे सहा खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत. शिंदेंचे २२ आमदार अजित पवारांच्या गटात जाणार आहेत आणि उरलेले आमदार गिरीश महाजन आपल्या खिशात घेऊन फिरतातय. माझ्याकडे सूत्रांची पक्की माहिती आहे. गिरीश महाजन यांनी शिंदेंचा पक्ष जमीनदोस्त करण्याचा प्रण केला आहे. महाजन शिंदेंचा पक्ष फोडतात ही पक्की माहिती आहे".