Maharashtra Political Crisis Updates in Marathi : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. तर ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. राज्यातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट हे एका क्लिकवर…

uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
nagpur rto marathi news, nagpur rto vehicles registration marathi news
धक्कादायक! बनावट कागदपत्रांवरून परराज्यातील वाहनांची नागपूर आरटीओत नोंदणी
satara lok sabha marathi news, udayanraje bhosale latest marathi news
मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याभोवतीच साताऱ्यातील प्रचार
maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Live Updates

Maharashtra News Today, 29 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर...

19:25 (IST) 29 Jul 2022
विरार : मोबाईल खेळताना सातव्या मजल्यावरून पडून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

वसईत मोबाईल खेळण्याच्या नादात एका साडेतीन वर्षीय मुलीचा तोल जाऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वसईच्या पश्चिमेला असलेल्या अग्रवाल कॉम्प्लेक्स मधील रेजन्सी वीला या इमारतीत आज (शुक्रवार) सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:57 (IST) 29 Jul 2022
निहार ठाकरे यांचा शिंदे गटाला पाठिंबा

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गट आणखी एक धक्का देण्याच्या तयारी आहे. उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी काही दिसवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

सविस्तर वाचा

18:46 (IST) 29 Jul 2022
गडचिरोली : सरकारी डॉक्टरच बांधत होता नक्षलवाद्यांचे बॅनर; तिघांना अटक

सरकारी एमबीबीएस डॉक्टरसह तीन जणांना नक्षल समर्थक म्हणून पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसाची गस्त सुरू असताना नक्षल्यांचे शहीद सप्ताहाचे बॅनर लावताना हे तिघे सापडले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा एमबीबीएस डॉक्टर पवन उईके, प्रफुल्ल् भट व अन्य एकाचा समावेश आहे. डॉक्टरसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:45 (IST) 29 Jul 2022
अमरावती :शेअर बाजारातील गुंतवणुकीतून १८ कोटी ५६ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावल्यानंतर म्युचअल फंडचे बनावट दस्तऐवज तयार करून ७९ नागरिकांची तब्बल १८ कोटी ५६ लाख ७३ हजार ६३४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ऋषभ राजेश सिकची (२७) रा. बियाणी चौक यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

18:39 (IST) 29 Jul 2022
‘महाराष्ट्रात कशाला जन्म घेतलात’ विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांचं उत्तर

बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असंही त्यांनी सुनावलं आहे.

सविस्तर बातमी

18:32 (IST) 29 Jul 2022
लोणावळा : बंगल्यातील तलावात वीजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

लोणावळ्यात दोन वर्षांच्या बालकाचा बंगल्यातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर तुंगार्ली भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात वीजेच्या धक्क्याने १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा

18:32 (IST) 29 Jul 2022
पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत वृक्षतोड प्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याप्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रशेखर गणपत जाधव (वय-६०, रा. कर्वे रस्ता, पुणे) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

18:31 (IST) 29 Jul 2022
कडोंमपाने मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढविली ; ३१ ऑगस्ट पर्यंत कर भरणाऱ्यांना सवलत

३१ जुलैच्या आत मालमत्ता कराची रक्कम भरणा करणाऱ्या नागरिकांना पालिका पाच टक्के सवलत देते. पालिकेतील ऑनलाईन सेवेतील तांत्रिक अडचणी, नागरिकांचा सवलतीमुळे कर भरण्याचा उत्साह पाहून प्रशासनाने ३१ जुलै ऐवजी सवलतीत कर भरणा करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

सविस्तर वाचा

18:28 (IST) 29 Jul 2022
Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी १७३ जागांपैकी ‘ओबीसी’साठी ४६ आरक्षित

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी १७३ जागांपैकी ४६ जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी (ओबीसी) शुक्रवारी आरक्षित करण्यात आल्या. नव्याने काढलेल्या आरक्षणात बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांना दिलासा मिळाला असला तरी काही माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची संख्या यामध्ये जास्त असून बदललेल्या आरक्षणामुळे कुटुंबातील महिला सदस्याला उमेदवारी द्यावी लागेल किंवा दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, आरक्षण निश्चित झाल्याने निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:28 (IST) 29 Jul 2022
रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालावी - खासदार अनिल बोंडे

रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी खासदार अनिल बोंडेंची यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांना आलेल्या पत्रासंदर्भात ते बोलत होते. तसेच राणा यांना आलेली धमकी गमतीने घेऊ नये, असेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा

18:15 (IST) 29 Jul 2022
पुणे जिल्हा अखेर टँकरमुक्त; जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले पाणी टँकर बंद

पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात सरासरी भरून काढलेल्या पावसाची त्यापेक्षा अधिकची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जुलैअखेरीस जिल्हा अखेर टँकरमुक्त झाला आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:58 (IST) 29 Jul 2022
अंबरनाथमध्ये भरदिवसा एकाची हत्या ; अज्ञात हल्लेखोरांचा सख्या भावांवर हल्ला, एक गंभीर जखमी

अंबरनाथ पूर्वेतील वडवली परिसरात शुक्रवारी दुपारी शिवसेना शाखेसमोर सख्या भावांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तुषार गुंजाळ असे मृताचे नाव असून त्याचा भाऊ गणेश गुंजाळ हा जखमी झाला आहे.

सविस्तर वाचा

17:49 (IST) 29 Jul 2022
पुणे : शंभराव्या जन्मदिनानिमित्त शिवशाहिरांना मानवंदना; एक हजार विद्यार्थ्यांचे समूहगान

‘मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनांना भरे कापरे…’ या गीताचे समूहगान करीत सहा शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांनी आज (शुक्रवार) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभराव्या जन्मदिनानिमित्त अनोखी मानवंदना दिली. पुरंदरे यांचा जन्म झालेल्या शुक्रवार पेठेतील शिर्के वाडा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.  वाचा सविस्तर बातमी...

17:46 (IST) 29 Jul 2022
कल्याण: राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली, कुटुंब रंगलय नगरसेवक होण्यात

आगामी पालिका निवडणुकीसाठीचे सर्वसाधारण महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासहचे एकूण ४४ प्रभागांमधील आरक्षण शुक्रवारी पालिका निवडणूक आयोगाने सोडत पध्दतीने जाहीर केले. नागरिकांच्या मागास प्रवर्गामुळे निवडणूक लढविण्यात असलेली संदिग्धता आज खऱ्या अर्थाने संपली.

सविस्तर वाचा

17:46 (IST) 29 Jul 2022
ठाणे जिल्ह्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या स्तरावर राबविण्यात येणार असून याअंतर्गत प्रभात फेरी, चित्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, ऐतिहासिक स्थळांना भेटी यांसारख्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 29 Jul 2022
ठाणे : हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

घोडबंदर येथील नागलाबंदर भागात हत्यार बाळगल्याप्रकरणी नरेंद्र मकवाना (२९) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि एक गुप्ती जप्त केली आहे.

सविस्तर वाचा

17:44 (IST) 29 Jul 2022
ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल

घाटकोपर- ठाणे या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या ठाणे शहरात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील ओवळा सिग्नल ते सीएनजी पंप पर्यंत मार्गिकेवर तुळई (गर्डर) टाकण्याचे काम केले जात आहे.

सविस्तर वाचा

17:44 (IST) 29 Jul 2022
उल्हासनगर : खड्ड्यांनंतर आता रस्त्यांची धुळधाण ,पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावर धुळीचा साम्राज्य

पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता पावसाने विश्रांती घेतल्याने प्रवासाती कसरत कमी झाली असली तरी खड्डे भरण्याच्या कामात मातीचा भरमसाठ वापर केल्याने आता रस्त्यांची धुळधाण झाली आहे.

सविस्तर वाचा

17:43 (IST) 29 Jul 2022
डोंबिवलीत पिस्तुल बाळगून दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक

डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव भागातील ज्योतीनगर झोपडपट्टीतील जलकुंभा जवळ पिस्तुल बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेबारा वाजता शिताफीने अटक केली. या तरुणाला पकडल्यानंतर ज्योतीनगर भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

सविस्तर वाचा

17:42 (IST) 29 Jul 2022
ठाणे : आरक्षण सोडतीत दिग्गजांना फटका तर काहींना फायदा

महापालिका निवडणुकीसाठी यापुर्वी जाहीर करण्यात आलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण क़ायम ठेवत र्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडतीद्वारे नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले.

सविस्तर वाचा

17:42 (IST) 29 Jul 2022
मुुंबईमध्ये अंधेरी पश्चिम भागात भीषण आग

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरात भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाचा सविस्तर

17:42 (IST) 29 Jul 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल ; शासकीय कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

सविस्तर वाचा

17:41 (IST) 29 Jul 2022
डोंबिवलीत गरीबाचापाडा भागात विजेचा लपंडाव ; जुनाट यंत्रणा तात्पुरती दुरुस्त करुन वीजप्रवाह सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न

डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक लोकवस्तीच्या गरीबाचापाडा प्रभागात गे्ल्या काही दिवसांपासून विजेचा सकाळपासून दिवसभर लपंडाव सुरू राहत असल्याने रहिवासी हैराण आहेत. घरातून कार्यालयीन काम करणाऱ्यांना या लपंडावाचा सर्वाधिक फटका बसतो.

सविस्तर वाचा

17:40 (IST) 29 Jul 2022
उल्हासनगर पालिकेत ओबीसींना २४ जागा ;आरक्षण सोडतीनंतर अनेकांची कोंडी

सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत ओबीसी सदस्यांसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. यात ओबीसींसाठी २४जागा आरक्षित करण्यात आल्या. एकूण ८९ सदस्य संख्या असलेल्या उल्हासनगर महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षण मिळाले होते. या आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसला आहे.

सविस्तर वाचा

17:39 (IST) 29 Jul 2022
मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या समिती निवडणुकीस स्थगिती नाही

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. असे असले तरी निवडणुकीचा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत जाहीर केला जाणार नाही, अशी हमी राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला न्यायालयात द्यावी लागली.

सविस्तर वाचा

17:39 (IST) 29 Jul 2022
कल्याण : खड्ड्यात दुचाकी आपटून ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिका हद्द आणि उल्हासनगर पालिका हद्दीतील आशेळे-माणेरे गावांमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये दुचाकी आपटून एका ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वासू राम वच्छानी (७०) असे अपघातात गंभीर जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा

17:38 (IST) 29 Jul 2022
मुंबई : शालेय बस, व्हॅनकडून नियमांना तिलांजली ; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या आणि घराजवळ सोडणाऱ्या शालेय बसगाड्या, व्हॅनचे चालक-मालक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत आहे. या गाड्यांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येत असून अग्निसुरक्षेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा

17:31 (IST) 29 Jul 2022
माजी मंत्री अमित देशमुख यांची खोटी सही करून आर्थिक फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

माजी मंत्री अमित देशमुख यांची बनावट सही करून मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात नोकरी लावतो, असे म्हणून एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभम पाटील नावाच्या व्यक्ती विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत एकनाथ गित्ते यांनी याबाबत देहू रोड पोलिसात तक्रार दिली असून ६ लाख ६६ हजारांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:31 (IST) 29 Jul 2022
पुणे : अनोळखी तरुणीशी ओळख तरुणाला पडली महागात; ६७ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड

अनोळखी तरुणीशी झालेली मैत्री एका तरुणाला महागात पडली. मैत्रीच्या आमिषात (हनी ट्रॅप) अडकवून तरुणी आणि साथीदारांनी तरुणाकडून ६७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर दोघा सराइतांना अटक करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...

16:19 (IST) 29 Jul 2022
राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार हे संजय राऊत यांच्यामुळेच - खासदार नवनीत राणा

राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार हे संजय राऊत यांच्यामुळेच आले असल्याची खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरे घरी बसले असून त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सविस्तर वाचा

15:52 (IST) 29 Jul 2022
ठाणे : तंटामुक्त हाउसिंग सोसायटी अभियानाचे आयोजन

ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता "तंटामुक्त हाउसिंग सोसायटी अभियान" यासंदर्भात मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

15:23 (IST) 29 Jul 2022
पुणे : डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्यापक महिलेचा मृत्यू ; वडगाव बुद्रुक परिसरातील दुर्घटना ,डंपरचालक पसार

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्याापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला.

वृषाली तुषार थिटे (वय ३८, रा. सुदत्त संकुल, शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 29 Jul 2022
चंद्रपूर : माजी नगराध्यक्ष जयस्वाल राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत, पवारांच्या वागणुकीमुळे दुखावले

माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक जयस्वाल राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात अजित पवार यांनी जयस्वाल यांना खडे बोल सुनावले. तेव्हापासून ते कमालीचे अस्वस्थ आहेत.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 29 Jul 2022
ठाण्याच्या गोखले रस्त्यावरील झाडाच्या फांद्यांसह पालापाचोळा उचलला ; लोकसत्ताच्या बतमीनंतर प्रशासनाला आली जाग

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले मार्गावर काही दिवसांपुर्वी वृक्ष छाटणीची कामे करण्यात आली असून छाटणी केलेल्या फांद्या तसेच पालापाचोळा उचलण्यात आलेल्या नसल्यामुळे त्यांचे रस्त्याकडेला ढिग लागल्याचे चित्र होते.

सविस्तर वाचा

15:00 (IST) 29 Jul 2022
उल्हासनगरात हजारोंची वीजचोरी उघड ; दोन दिवसात चार गुन्हे, ३ हजार ७४० युनीटची चोरी

महावितरणाकडून एकीकडे वीज बिलांची वसुली आग्रही पद्धतीने केली जात असतानाच वीज चोरी करणाऱ्यांचाही छडा लावला जातो आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसात उल्हासनगरात वीज चोरी करणाऱ्याविरूद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

14:59 (IST) 29 Jul 2022
मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन, ४८ इमारतींवरील कारवाई अटळ

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून मुंबई विमानतळ परिसरातील उभ्या राहिलेल्या ४८ इमारतींवरील कारवाई अटळ आहे. उंचीचे नियम मोडून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या मजल्यांवरील पाडकामाची कारवाई कशी करणार ? असा प्रश्न करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सविस्तर वाचा

14:58 (IST) 29 Jul 2022
प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यभरातील रिक्षा संघटनाची शनिवारी मुंबईत बैठक

रिक्षासाठी खुले केलेले परवाने त्वरित रद्द करावे, मॅक्सीकॅबला वेसण घालावी आदी विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीची शनिवारी मुंबईतील काळबादेवी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:47 (IST) 29 Jul 2022
पुणे जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळा आता ‘ईडी’च्या रडारवर

पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत झालेला शिक्षक भरतीचा घोटाळा आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. हा घोटाळा उघडकीला आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीने चौकशी करून अधिक माहिती घेण्यासाठी बोलावले असून, या शिक्षक भरती घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला संशय आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:36 (IST) 29 Jul 2022
Mumbai municipal elections : आरक्षण सोडतीचा दिग्गजांना फटका

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा फटका माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांना बसला आहे. या सर्वांचे प्रभाग आरक्षित झाले असून आगामी निवडणूक लढविण्यासाठी या मंडळींना आसपासच्या प्रभागात चाचपणी करावी लागणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:31 (IST) 29 Jul 2022
उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवार यांचा टोला

मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावलाय. ते वर्धा जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर

14:25 (IST) 29 Jul 2022
खासदार नवनीत राणा यांच्‍या जीवाला धोका?; अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या पत्रामुळे खळबळ!

खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणाऱ्या कथित अल्‍पसंख्‍यांक व्यक्तीने याबाबत खासदारांना पत्र पाठवून महिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:16 (IST) 29 Jul 2022
ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस ; खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड पूर्ण

ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात मागील २८ दिवसांच्या कालावधीत तब्बल १६५३.५० मिमी इतका पाऊस झाल्याने जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १५६.८० टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद ही अंबरनाथ तालुक्यात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:12 (IST) 29 Jul 2022
“जगाच्या तुलनेत भारतात ७५ टक्के वाघ - भुपेंदर यादव

“जगातील वाघांच्या एकूण संख्येच्या तुलनेत भारतात ७५ टक्के वाघ आहेत. त्यादृष्टीने भारत मोठी शक्ती आहे, असे केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव म्हणाले. वाचा सविस्तर बातमी...

14:11 (IST) 29 Jul 2022
पुणे : प्रत्येक खड्ड्यासाठी पाच हजारांचा दंड

शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रती खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:06 (IST) 29 Jul 2022
पुणे बाजार समितीने सेस रद्द करावा ; दि पूना मर्चंट्स चेंबरची मागणी

केंद्र सरकारने आधीच अन्नधान्यांवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावून व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा टाकला आहे. त्यातच आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्याने काही वस्तूंवर सेस लावल्याने त्यात आणखी भर पडणार आहे, त्यामुळे बाजार समितीने सेस त्वरित रद्द करावा

सविस्तर वाचा

14:06 (IST) 29 Jul 2022
पुणे शहरातील पाच प्रभागांमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण

पावसाळ्याला सुरुवात होताच शहरात कीटकजन्य आजारांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. जुलै महिन्यात शहरात ५२ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे.

सविस्तर वाचा

13:54 (IST) 29 Jul 2022
Smriti Irani Defamation Case: २४ तासात ट्वीट डिलीट करा, अन्यथा.., हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं

भाजपा नेत्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना संबंधित ट्वीट तात्काळ डिलीट करण्याचा आदेश दिला आहे. गोव्यातील एका रेस्तराँ प्रकरणी हे आरोप करण्यात आले आहेत. हा रेस्तराँ स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचा असून यामध्ये बेकायदेशीरपणे मद्यालय चालवलं जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. स्मृती इराणी यांनी याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोर्टाने काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांना समन्स बजावलं आहे.

सविस्तर बातमी

13:45 (IST) 29 Jul 2022
पुणे : राज्य शिक्षक पुरस्काराच्या अर्जांसाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदत

राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना येत्या ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल .

सविस्तर वाचा

13:42 (IST) 29 Jul 2022
नागपूर : अपघात, विषबाधेने दगावणाऱ्यांनाही करोना ! ; मेडिकलमध्ये महिन्याभरात सहा रुग्णांची नोंद

जिल्ह्यात २४ तासांत एक करोनाग्रस्ताचा मृत्यू तर २६९ नवीन रुग्णांची भर पडली. सातत्याने येथे रुग्ण वाढत असतानाच आता शासकिय रुग्णालयात (मेडिकल ) अपघात, विषबाधासह इतर कारणांनी दगावलेल्यांमध्येही करोना असल्याचे आढळत आहे. गेल्या महिन्याभरात येथे असे सहा रुग्ण नोंदवले गेले.

सविस्तर वाचा

13:32 (IST) 29 Jul 2022
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम; २३६ प्रभाग आरक्षण जाहीर

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ६३ प्रभाग आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी ३२ प्रभाग इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. प्रभाग आरक्षित झाल्यामुळे काही माजी नगरसेवकांना आगामी निवडणूक लढविण्यासाठी अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

Maharashtra News Updates Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स, महाराष्ट्र पॉलिटिकल क्रायसिस अपडेट्स