मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठ्यांना १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसींमधूनच आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यासाठी त्यांनी आंदोलन चालूच ठेवलं आहे. यासंदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. या सगळ्याच्या पाठिशी देवेंद्र फडणवीसच असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी आंतरवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

“हे राज्य एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नव्हे तर देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच आहेच. त्यांनी ठरवलं तर काही वेळात सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईल. पण देवेंद्र फडणवीस हे होऊ देत नाही”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर जीवे मारण्याचा कट रचल्याचाही आरोप केला.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Satara, Prithviraj Chavan
शरद पवार यांनी आदेश दिल्यास साताऱ्यातून लढायला तयार – पृथ्वीराज चव्हाण

“तुम्ही कुणाकुणाला हाताशी धरलंय हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही गुलाबराव पाटलांना संपवण्यासाठी गिरीश महाजनांना हाताशी धरलं”, असंही जरांगे पाटील म्हणाले.

“मी बंगल्यावर येतोय, मारून दाखवा”

दरम्यान, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मला सलाईनमधून वीष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर येतो मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.

मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप; म्हणाले, “मला सलाईनमधून विष…”

“मी आता चालत सागर बंगल्यावर जातोय. तिथे उपोषण करेन. जर रस्त्यात मी मेलो, तर मला देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेऊन टाका. आता मी एकतर मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो, नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो”, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी एकेरी उल्लेख करत टीकास्र सोडलं.