एकनाथ खडसे कधी प्रवेश करणार? राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर चर्चा ?

संग्रहित (PTI)

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली असं सांगितलं जात आहे. याचसंबंधी विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले. टीव्ही ९ ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.

आणखी वाचा- खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही – सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही,” असं ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश? चंद्रकांत पाटील म्हणतात…

“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ… खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp jayant patil on reports of eknath khadse joining party sgy

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या