शिवसेनेचा दसरा मेळावा आणि संघटना बांधणीसाठी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या बीड जिल्हा दौऱ्यावर आहे. यावेळी निलम गोऱ्हे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने दोन जणांना रोजगार मिळवून दिला आहे. तो म्हणजे किरीट सोमय्या आणि नवनीत राणा, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी सोमय्या आणि राणांचा समाचार घेतला आहे.

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांना स्थगिती देण्यात येत आहे. राज्यातील उद्योग-धंदे अन्य ठिकाणी जात आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मात्र, यांचे वेगळेच उद्योग सुरु आहे,” असा आरोप निलम गोऱ्हे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंकजा मुंडे लोकनेत्या आहेत”

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वादावर निलम गोऱ्हे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. “पंकजा मुंडेंना मी बऱ्याच वर्षापासून ओळखते, त्या लोकनेत्या आहेत. त्यांचे काम देखील चांगलं त्या काय बोलल्या माहीत नाही. मात्र, त्यांची प्रगती व्हावी,” अशा शुभेच्छा निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.