सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत फक्त खाबुगिरी असून आपण चौकशीची मागणी केली आहे. लवकरच बँकेच्या कारभाराचा कायद्यानुसार पंचनामा होईल, असे सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेवर कारवाईचे संकेत दिले. दरम्यान ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली. मला याबाबतीत न्यायालयाची नोटीसही आली आहे. मात्र, गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मांतरणाच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याला आम्ही विरोध करत राहू. भले माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही, असेही ते येथील एका कार्यक्रमात सांगितले.
सांगलीतील सदाशिव शेजाळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत आमदार पडळकर बोलत होते. पडळकर म्हणाले, की कोट्यवधीची उलाढाल असलेल्या जिल्हा सहकारी बँकेत काही गैरप्रकार सुरू असल्याचे दिसत असून याची चौकशी करण्याची आपण मागणी केली आहे. बँकेचा कारभार अनियमित असून गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर संबंधित दोषी विरुध्द गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत फक्त खाबुगिरी असून आपण चौकशीची मागणी केली आहे. लवकरच बँकेच्या कारभाराचा कायद्यानुसार पंचनामा होईल, असे सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेवर कारवाईचे संकेत दिले. कोट्यवधीची उलाढाल असलेल्या जिल्हा सहकारी बँकेत काही गैरप्रकार सुरू असल्याचे दिसत असून याची चौकशी करण्याची आपण मागणी केली आहे. बँकेचा कारभार अनियमित असून गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर संबंधित दोषी विरुध्द गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान सांगलीत बाळासाहेब गलगले फौंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या हस्ते व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी नगर सेवा पुरस्कार पांडुरंग कोरे, वृत्तपत्र सेवा पुरस्कार शेखर जोशी, सहकार सेवा उदयराव यादव, क्रीडा सेवा सचिन खिलारी, शाहिरी सेवा आविष्कार देशिंगे आणि पर्यावरण सेवा पुरस्कार डॉ. मनोजकुमार पाटील यांना प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या मोर्चावर टीका केली. ते म्हणाले, की ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली.
मला याबाबतीत न्यायालयाची नोटीसही आली आहे. मात्र, गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मांतरणाच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याला आम्ही विरोध करत राहू. भले माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही, असेही त्यांनी सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले.