शिवसेना नेते आनंद दिघे आमच्यातून गेलेले नाहीत. ते आजही आहेत. ते सर्व बघत आहेत आणि आगामी निवडणुकीत ते चमत्कार दाखवतील,” असं मत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केलं. विचारे शुक्रवारी (२६ ऑगस्ट) आनंद दिघे यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्ताने ठाण्यातील स्मृतीस्थळावर आले असताना माध्यमांशी बोलत होते.

राजन विचारे म्हणाले, “आम्हा शिवसैनिकांचं दैवत आनंद दिघेंना जाऊन आज २१ वर्षे पूर्ण झाले आहेत. आमच्यासारखे असंख्या कार्यकर्ते आनंद दिघेंच्या आशीर्वादाने घडले. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता शाखाप्रमुख ते खासदार होतो. हे केवळ आनंद दिघेंच्या आशीर्वादामुळे झालं.”

हेही वाचा : ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री बरा’ म्हणणाऱ्या शिंदेंना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले “बरं झालं तुम्ही गेलात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“येत्या निवडणुकीत आनंद दिघे चमत्कार दाखवतील”

“आज आम्ही असंख्य कार्यकर्ते इथं आलो आहोत. आनंद दिघे ठाणे जिल्ह्याचं दैवत होते. या दैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहे. आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आहेत आणि सर्व बघत आहेत. येत्या निवडणुकीत आनंद दिघे चमत्कार दाखवतील,” असं म्हणत राजन विचारेंनी शिंदे गटाला सूचक इशारा दिला आहे.