महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रणशिंग फुंकलं आहे. अशातच आता शरद पवार यांच्या गटातील एक आमदार आणि खासदार अजित पवारांबरोबर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या गटावर गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी कुणाची? यावर निवडणूक आयोगसमोर दोन्ही गट गेले आहेत. तर, दोन्ही गटाकडून एकमेकांना अपात्रतेच्या नोटिसा देणं सुरू आहे. यातच आमदार-खासदार आपली दिशा स्पष्ट करत आहेत. आता शरद पवार गटातील एक आमदार आणि खासदाराने पाठिंब्याच्या सहीचं प्रतिज्ञापत्र अजित पवार यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : “एकनाथ शिंदे अन् राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त लोकसभेसाठी जवळ घेतलं, पण…”, रोहित पवारांची भाजपावर टीका

यावर ‘एबीपी माझा’शी बोलताना रोहित पवार म्हणाले, “खरचं सह्या केल्यात का? हे पाहावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, तोपर्यंत तुमची कामं करणार नाही, अशा पद्धतीनं ब्लॅकमेल केलं जात आहे.”

हेही वाचा : एमपीएससी पेपर फोडणाऱ्यांची नावं गुणवत्ता यादीत, रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शेतकरी, कष्टकरी आणि तरूणांच्या प्रश्नांसाठी आमदार प्रामणिक प्रयत्न करत आहेत. पण, तू सही कर, नाहीतर काम होणार नाही, असं काही नेते सांगत असल्याचं कळत आहे. अशा पद्धतीनं आकडा तुमच्या बाजूनं दिसेल. मात्र, निवडणूक आल्यावर खरंच किती लोक त्यांच्याबरोबर आहेत, हे कळेल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.