scorecardresearch

Dasara 2022: विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव, मातृभाषा जतन करण्याचे आवाहन

विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षण केले

Dasara 2022: विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव, मातृभाषा जतन करण्याचे आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला. “पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणं योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक आहे” असे सरसंघचालक या सोहळ्यात म्हणाले आहेत. रेशीमबाग मैदानातील या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संतोष यादव या महिलेला स्थान देण्यात आले. विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षण केले.

‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

नागपुरातील विजयादशमी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कृपाल तुमाने उपस्थित आहेत. जगात आपल्या देशाचं वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी म्हटले आहे. समाजात मातृभाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे. भाषेचं जतन करणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले आहे.

दसरा मेळाव्याचा आखाडा ; शक्तिप्रदर्शनासाठी सज्जता: शिवाजी पार्क, बीकेसीकडे सर्वाचे लक्ष

सरसंघचालकांनी देशाच्या लोकसंख्येवरदेखील यावेळी भाष्य केले. लोकसंख्या ही समस्या आहे, मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो, असे सरसंघचालक म्हणाले आहेत. लोकसंख्या कमी झाल्यास समाजात असमतोल निर्माण होईल, असेही भागवत यांनी म्हटले आहे. देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होत आहे. कोरोनासारख्या आपत्तीकाळातून बाहेर पडून आता आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणाऱ्या शक्ती नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे. या शक्तींना उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना समाजाने साथ द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करायला आदित्य ठाकरे शिवतीर्थावर, बाळासाहेबांनाही केलं वंदन, पाहा PHOTOS

आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि नफेखोरीमुक्त अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे संघाने सरकारला सुचवल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले. सरकारने उद्योगशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात रोजगार प्रशिक्षणाच्या विकेंद्रित योजना राबवण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी सरकारला केले. मंदिर, पाणी आणि स्मशाने जोवर सर्व हिंदूंसाठी खुली होत नाहीत, तोवर समता हे केवळ स्वप्नच राहणार आहे. चिथावणीखोर कोणीही असो, कायदा आणि घटनेच्या चौकटीत राहूनच सर्वांनी आपला विरोध नोंदविला पाहिजे, असेही विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या