सांगली : घाटकोपर येथील होर्डिग दुर्घटनेनंतर सांगली महापालिका क्षेत्रातील होर्डिंगची अभियांत्रिकी पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासन शुभम गुप्ता यांनी दिली. सांगली महापालिका क्षेत्रात २९७ होर्डिंग्ज असून तशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या असून ३० टक्के होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून करण्यात येणार आहे.

हेही वाचा – सांगली : बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानातील कसाबविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा – तुळजाभवानी देवीस अकरा तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारण्यात आले असून घाटकोपर दुर्घटनेनंतर या होर्डिंगच्या सुरक्षेचा विषय समोर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच होर्डिंगची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी अभियांत्रिकी पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका मालकीच्या जागेत निविदा प्रक्रिया राबवून उभारण्यात आलेल्या होर्डिंगची संख्या ७२ असून उर्वरित २२५ होर्डिग खासगी मालकीच्या जागेत व इमारतीवर आहेत. पडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ठेकेदाराकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असतानाच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञामार्फत स्वतंत्रपणे ३० टक्के होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.