शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याची घोषणा सोमवारी ( २३ जानेवारी ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेबरोबर युती झाली आहे. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीत सहभागी होण्याबद्दल अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. अशात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असा गौप्यस्फोट करत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

हेही वाचा : शिंदे-फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिलं नव्हतं, नाना पटोलेंचा मोठा दावा

यानंतर राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “अशा प्रकारची विधानं कोणीही करु नये. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : “शरद पवार भाजपाबरोबर आहेत म्हणणं…”, संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले…

“भाजपाच्या यंत्रणांनी सर्वात जास्त हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली आहे. अपेक्षा आहे, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे घटक होतील. पण, महाविकास आघाडीचा भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.