वाई:बहिणींची छेडछाड करणाऱ्यास माझ्या बहिणीची छेड काढू नकोस, असं समजावून सांगायला गेलेल्या भावाच्या घरावर  ३० हून अधिक युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी पांगारे ग्रामस्थांनी रविवारी अचानक आक्रमक होत तरुणाच्या मृतदेहासह रुग्णवाहिका पोलीस मुख्यालयाच्या समोर आणल्याने तणाव निर्माण झाला. दोषींवर कठोर कारवाईची  मागणी ग्रामस्थांनी  केली.

हेही वाचा >>> वसई: कोपर उड्डाणपुलावर भीषण अपघात; तीन वाहनांची एकाच वेळी धडक

पांगारे (ता सातारा)गावातील मुलगी राजापुरी (ता सातारा)शाळेत  शिकत आहे. राजपुरी गावातील तरुणाने या मुलीची  वारंवार छेड काढली होती. त्यामुळे तिने तिचा भाऊ राहुल यास तिने कल्पना दिली. त्यानंतर माझ्या बहिणीची छेड काढू नकोस, असं समजावून सांगायला गेलेल्या भावाच्या घरावर  ६ मे २०२३ रोजी ३० हून अधिक युवकांनी हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या राहुल शिवाजी पवार (वय २८) या युवकाचा पुणे येथे आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिकेसह सातारा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आले.तणाव निर्माण झाल्याने सातारा शहर व शाहूपुरी पोलीस यांचा कडक बंदोबस्त मुख्यालय परिसरात तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा पोलिसांनी यशस्वी शिष्टाई करत सर्व संशयित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर युवकाचा मृतदेह गावकरी अंत्यसंस्कारासाठी पांगारे येथे घेवून गेले. त्यानंतर साताऱ्यातील तणाव निवळला.

माझ्या बहिणीची छेड काढू नकोस, असं समजावून सांगायला गेलेल्या भावाच्या व छेड काढणाऱ्या तरुणांमध्ये  वादावादी होऊन या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.  पहाटे अडीचच्या दरम्यान राहुल शिवाजी पवार व त्याचे कुटुंबीय रात्री झोपेत असताना गणेश युवराज मोरे यांच्यासह तीस तरुणांनी राहुल पवार व कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला प्रत्यक्षात नयन पवार याला मारण्याचा प्रयत्न होता मात्र यामध्ये राहुल पवार याला बेदम मारहाण झाल्याने गंभीर जखमी झाला होता.

हेही वाचा >>> Video: नांदेड: अस्वला चा दिगडी च्या शाळेत मुक्तसंचार!

साताऱ्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्याला पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते दोन महिने उपचार करूनही त्याची प्राणज्योत मालवली या मारहाण प्रकरणांमध्ये पोलिसांनी केवळ बारा संशयित आरोपींना पूर्वीच अटक केली आहे .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी मृत तरुणाचा मृतदेह पोलीस मुख्यालयासमोर आणून घेराव घातला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली .ग्रामस्थांनी मुख्यालयाचा रस्ता अडवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ..शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा हे पोलीस फाट्यास तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी पांगारे ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेत योग्य तपासाच्या सूचना पोलिसांना दिल्या.