सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये विकसित भारताचा अमृत काळ या संकल्पनेंतर्गत उत्तम सेवा सुशासन आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण असा पारदर्शी कारभार केला. अकरा वर्ष केंद्रात पूर्ण केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर नवीन उंची देण्याचा प्रयत्न आहे. यामुळेच नुकतेच भारताने जपानला मागे टाकून देशातील चौथ्या क्रमांकाच्या महासत्तेचे उद्दिष्ट गाठल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे,भाजपचे पदाधिकारी रामकृष्ण वेताळ सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर सातारा विधानसभा मतदारसंघाचे संयोजक अविनाश कदम माजी शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की सर्वसामान्य लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी व देशाला नवीन जागतिक उंची देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा अनुभव दिला आहे. मोदी सरकारने देशाच्या सीमा मजबूत केल्या, अर्थव्यवस्था मजबूत केली. तंत्रज्ञान सर्व सामान्य पर्यंत पोहोचवले .
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी प्रवृत्तीचा बीमोड केला. हिंसाचाराला घरात घुसून मारले जाईल हेच मोदी सरकारने दाखवून दिले आहे. .याशिवाय भारताचे संरक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संरक्षक प्रणाली ,सर्वसामान्य जीवनाच्या सुखकर जीवनासाठी कालबद्ध कार्यक्रमाची वचनबद्धता,देशातील९६ नक्षलवादी जिल्ह्यांमध्ये विकासाचा नवा प्रवाह अशी आश्वासक पावले मोदी यांनी टाकत भारताला अडचणीचे ठरणारे३७० कलम रद्द करून विरोधकांना एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक लगावला आहे.
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे . जगात होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारापैकी ४९ टक्के व्यवहार एकट्या भारतात होतात .भारताची वस्तू आणि सेवा निर्यात ८२५ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली आहे . देशात होणाऱ्या यूपीआय व्यवहारांची उलाढाल २४ लाख कोटी पर्यंत पोहोचली आहे देशाध्यक्ष १६ कोटी मोबाईल वापर करते आहेत, तर देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या९७ कोटी वर पोहोचली आहे हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे.जी एम पोर्टल,सरकारी योजनांचे लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना पोहोचवणे,चांद्रयान मोहिम ३ यशस्वी करणे, पायाभूत सुविधांची मजबूतता अशा विविध माध्यमातून केंद्र शासनाने सर्वसामान्यांचे मन जिंकले आहे .
भारतात १३६ वंदे भारत रेल्वे सुरू झाले आहेत . ईशान्यकडील राज्यांच्या विकासावर मोदी सरकारने लक्ष दिले आहे त्या राज्यांसाठी ४४ हजार कोटींच्या विकास योजना राबवल्या गेल्या आहेत महिलांना सैनिकी शाळांमध्ये व एनडीए मध्ये प्रवेश देण्यात येत असून महिला सैनिक देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. देशात आयुर्विज्ञान संस्थांची संख्या २३ वर गेली आहे तर आठ नव्या इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सुरू झाले आहेत ४९० विद्यापीठांची देशात घोषणा झाली असून दीड कोटी युवकांना कौशल्य निश्चित विकास कार्यक्रम दिला जात आहे.