कराड : पारधी समाजातील तरुण सख्या बहिण- भावाचा खून झाल्याची खळबळजनक घटना फलटण तालुक्यातील निंभोरे (ता. फलटण) येथील पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी घडली.

दुहेरी खुनाची धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस येताच विशेषतः फलटण तालुक्यासह सातारा जिल्हा हादरला. सिकाबाई तुकाराम शिंदे (३२) व सुमित तुकाराम शिंदे (१५) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे.

हेही वाचा…दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने हे खून कोणी, कशासाठी केले असावेत याची एकच चर्चा असून, तर्क- वितर्क लढवले जात आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत असून, त्यांच्याकडून घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरु आहे.