आदिवासी समाजावर अन्याय न करता, धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाबाबत राष्ट्रवादीने मौन बाळगले होते. त्यामुळे धनगर आरक्षणास राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे चित्र निर्माण झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत या गोष्टीचा फटका राष्ट्रवादीला बसु शकतो याचा अंदाज आल्याने शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी सावध भूमिका घ्यायला ते विसरले नाहीत. धनगर समाजाचा समावेश तिसऱ्या सुचीत न करता पहिल्या सूचितच करावा अशी मागणी यावेळी पवारांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2014 रोजी प्रकाशित
धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
आदिवासी समाजावर अन्याय न करता, धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाबाबत राष्ट्रवादीने मौन बाळगले होते.

First published on: 16-08-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar supports dhangar aarakshan