कराड : महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यापुढे भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. त्यांना पक्षाची ताकद मिळेल आणि समन्वयातून शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या कराडमधील सभेनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास आदींची उपस्थिती होती.

आमदार गोरे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने पक्ष आणि सत्तेच्या माध्यमातून शिक्षक संघाला भक्कम ताकद देण्याचे काम करण्यात होईल. त्यासाठी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पडणार आहे.

आणखी वाचा-अलिबाग: राष्ट्रवादीच्या बॅनरवरून शरद पवार गायब

शिक्षक संघाच्या आजच्या बैठकीत एकमताने भाजपच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवला. शिक्षकांच्या प्रश्नावर आम्ही कायमच सहकार्याची भूमिका ठेवली असून, ती यापुढेही कायम राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन कोळी म्हणाले, नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्यभरात एक लाखांहून अधिक सभासद आहेत. केवळ सातारा जिल्ह्यात संघाचे पावणेतीन हजार सभासद आहेत. अगदी सुरुवातीपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आम्हाला भाजपचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे विनाअट संघाने यापुढे भाजप प्रणीत संघटना म्हणून काम करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला असल्याचे कोळी यांनी सांगितले.