मुंबई : शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना असा राजकीय प्रवास के लेले माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश के ला असला तरी मोहिते आणि राष्ट्रवादी या उभयतांना त्याचा राजकीय लाभ होणार का, हा प्रश्न आहे. अनिल देशमुख यांच्या पिछेहाटीनंतर राष्ट्रवादीला विदर्भात नवीन चेहरा सापडला आहे.
सुबोध मोहिते यांनी पुण्यातील समारंभात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश के ला. विदर्भात मोहिते यांच्या अनुभवाचा वापर करून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. दोन दशकांपूर्वी मोहिते यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश के ला. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते हे रामटेक मतदारसंघातून निवडून आले. तेव्हा शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी होती. मनोहर जोशी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर शिवसेनेच्या वाटय़ाला असलेल्या मंत्रिपदासाठी सुबोध मोहिते यांना संधी देण्यात आली. तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. नवख्या मोहिते यांना थेट कॅ बिनट दर्जाचे मंत्रिपद दिल्याने शिवसेनेत साऱ्यांच्याच भुवया उंचाल्या होत्या. पुढे मोहिते यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी तेवढे सूत जमले नाही. नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र के ल्यावर मोहिते यांनीही शिवसेनेचा व खासदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये प्रवेश के ला. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या बंडखोरीमुळे मोहिते यांचा पराभव झाला. काँग्रेसने विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, पण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुणे दौऱ्यामुळे मोहिते यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणासाठी परवानगी मिळण्यास विलंब झाला आणि मुंबईच्या विधानभवनात वेळेत पोहचू शकले नाहीत. विधानसभा निवडणुकीतही त्यांची डाळ शिजू शकली नाही. आमदारकीने हुलकावणी दिली व तेव्हापासून मोहिते राजकीय विजनवासात गेले होते.
राष्ट्रवादीला विदर्भात गेल्या २२ वर्षांत बाळसे धरता आलेले नाही. यामुळे नव्या नेत्यांची पक्षाला गरज आहेच. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे राजकीय भवितव्य आता कठीणच दिसते. ही पोकळी भरून काढण्याकरिता मोहिते यांचा वापर करून घेतला जाऊ शकतो. आगामी लोकसभा निवडणुकीत वर्धा मतदारसंघ किं वा विधानसभेला उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. विदर्भाचे नेतृत्व करायचे असल्यास मोहिते यांना विदर्भ पिंजून काढावा लागेल. राष्ट्रवादीने बरेच प्रयत्न करूनही विदर्भात पक्ष वाढला नाही. शरद पवार यांचे नेतृत्व विदर्भाने स्वीकारले नाही. १९९९ व २०१४ मध्ये स्वबळावर लढताना राष्ट्रवादीला विदर्भात यश मिळाले नव्हते. अगदी २०१४च्या निवडणुकीत विदर्भातून एकच आमदार निवडून आला होता. काँग्रेसबरोबर आघाडी के ल्यास काही जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतात. या पार्श्वभूमीवर मोहिते हे राष्ट्रवादीला कितपत उपयुक्त ठरतील याबाबत साशंकताच व्यक्त के ली जाते.
दोन दशकांपूर्वी मोहिते यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते हे रामटेक मतदारसंघातून निवडून आले. तेव्हा शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी होती. मनोहर जोशी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर शिवसेनेच्या वाटय़ाला असलेल्या मंत्रिपदासाठी सुबोध मोहिते यांना संधी देण्यात आली. तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.