शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच् नंतर उद्धव ठाकरे गटातील आणखी तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात येतील, असा दावा केला. यावर आता ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “निष्ठेला विष्ठेचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या या गद्दार लोकांना त्यांनी जशी खोक्यांसाठी गद्दारी केली तशीच इतर सर्वजण करतील असं वाटतं,” असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर पलटवार केला. ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बुलढाणा येथे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

विनायक राऊत म्हणाले, “प्रताप जाधव यांनी शिवसेनेचे आठ आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात येणार असा दावा केला. मात्र, तो गौप्यस्फोट नाही, तर कोल्हेकुई आहे. जसं काविळ झालेल्या व्यक्तिला सर्वच पिवळं दिसतं, तसंच निष्ठेला विष्ठेचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या या गद्दार लोकांना त्यांनी जशी खोक्यांसाठी गद्दारी केली तशीच इतर सर्वजण करतील असं वाटतं. परंतु त्यांचा भ्रमनिरास होईल.”

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!

“विचाराची निष्ठा आणि श्रद्धा आमच्याकडून शिका”

“आज आम्ही जे कोणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेत राहिलो आहोत ते खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे पाईक आहेत. त्यांच्या पायाचं अमृत आम्ही प्यायलो आहोत. विचाराची निष्ठा आणि श्रद्धा काय असते हे त्यांनी आमच्याकडून शिकून घ्यावं,” असा खोचक टोला विनायक राऊतांनी शिंदे गटाला लगावला.

व्हिडीओ पाहा :

प्रतापराव जाधव नेमकं काय म्हणाले होते?

प्रतापराव जाधव म्हणाले, “अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत. ते नेतृत्वावर प्रेम आहेत म्हणून ठाकरे गटात थांबलेले नाहीत. त्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे व्यक्तिगत प्रश्न असल्याने ते तिकडे थांबले आहेत.”

“निवडणुका जवळ येतील तसं त्यांचं घर रिकामं होईल”

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात आले. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं त्यांचं घर रिकामं झालेलं दिसेल. तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना मजबुतीने पुढे येईल,” असं मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: “अस्सलाम वालेकुम लाचारांनो” म्हणत भाजपाची सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ व्हिडीओवर टीकेची झोड

“…तेव्हा १५ पैकी किमान ७-८ आमदार शिंदे गटात येतील”

“ठाकरे गटातील सर्वच आमदार स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे तेथे थांबले आहेत. निवडणुका येतील तेव्हा १५ पैकी किमान ७-८ आमदार आणि पाचपैकी दोन ते तीन खासदार शिंदे गटात येतील,” असा दावाही खासदार प्रतापराव जाधवांनी केला.