News Flash

…म्हणून करण देओलवर भडकला केआरके

नुकतीच केआरकेची करण देओलसोबत विमानतळावर भेट झाली होती

सनी देओलच्या मुलाने करण देओलने नुकतंच ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटामध्ये करण मुख्य भूमिकेत झळकला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीत उतरला नसला तरी करण देओलची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र या साऱ्यामध्ये स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानने (केआरके) करणवर नाराजी व्यक्त केली आहे.

नुकतीच कमाल आर खानची करण देओलसोबत विमानतळावर भेट झाली होती. मात्र करणने केआरकेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यामुळे केआरकेने ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत करणला वागण्याची पद्धत नसल्याचं म्हटलं आहे.

‘मी करणला विमानतळावर पाहिलं. मात्र त्याने माझ्याकडे पाहून साधी ओळख सुद्धा दाखवली नाही. मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा आणि आघाडीचा चित्रपट समीक्षक आहे. तरीदेखील तो माझ्यासोबत असं वागला. त्याच्या वर्तनाकडे पाहून हे लक्षात आलं की, तो केवळ अभिनयातच कमकुवत नाही, तर त्याच्यामध्ये अ‍ॅटीट्युडही तितकाच आहे. जर तो असंच वागत राहिला तर तो बॉलिवूडमध्ये कधीच यशस्वी होणार नाही’, असं केआरके म्हणाला.

करणच्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सनी देओलने केलं असून निर्मिती धर्मेंद्र यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:33 pm

Web Title: actor kamaal r khan tweet for sunny deol son karan deol ssj 93
Next Stories
1 नेहा कक्करशी ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशने केलं ‘हे’ वक्तव्य
2 रात्रीस खेळ चाले – २ : शेवंताचा खून की आत्महत्या
3 मराठी वेब सीरिजचा धुमाकूळ!
Just Now!
X