News Flash

‘मुळशी पॅटर्न’च्या यशानंतर पुनीत बालन स्टुडिओज घेऊन येत आहे ‘जग्गु आणि Juliet’

महेश लिमये यांचे दिग्दर्शन, अजय – अतुल यांचे संगीत.

‘मुळशी पॅटर्न’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर युवा उद्योजक, निर्माते पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या आगामी ‘जग्गु आणि Juliet’ चित्रपटाची नववर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा करण्यात आली. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय– अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक असे पहिले पोस्टर सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

मराठीसह बॉलिवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या महेश लिमये यांना ‘यलो’ या संवेदनशील विषयावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा महेश लिमये दिग्दर्शक म्हणून ‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. तर आपल्या अनोख्या संगीताच्या माध्यमातून मराठीसह बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल, ‘जग्गु आणि Juliet’ च्या निमित्ताने आपल्या मराठी चाहत्यांना एक बहारदार संगीत आणि पार्श्वसंगीताची खास मेजवानी घेऊन येणार आहेत. महेश लिमये, गणेश पंडित आणि अंबर हडप या त्रयींची ही जबरदस्त कथा आणि पटकथा असून त्यातील प्रभावी संवाद हे गणेश पंडित आणि अंबर हडप यांचे आहेत.

सोशल मीडियावर नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय असलेल्या ‘जग्गु आणि Juliet’ च्या पोस्टर मध्ये कुणीतरी एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत आहे. त्याला लंडनच्या बिग बेनची पार्श्वभूमी लाभलेली आहे. अतिशय आकर्षक मांडणीमुळे लक्षवेधी ठरलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारे ते दोन हात नक्की कुणाचे आहेत ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार असून महेश लिमये यांच्या नजरेतून निसर्ग सौंदर्याने नटलेला युरोप या चित्रपटात हटके अंदाजात बघायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 3:34 pm

Web Title: after mulshi pattern success punit balan studios presenting jaggu and juliet ssv 92
Next Stories
1 विराट नाही तर हा आहे अनुष्काचा ‘सिरिअल चिलर’ मित्र
2 गरोदरपणातही ‘फिटनेस फर्स्ट’! शिर्षासनानंतर अनुष्काचा ट्रे़डमीलवरचा Video व्हायरल
3 कारवाईनंतर अरबाज, सोहेल आणि निर्वाण झाले ताज हॉटेलमध्ये क्वारंटाइन
Just Now!
X