News Flash

भारतातला एकेकाळचा सगळ्यात मोठा घोटाळा, अभिषेक बच्चन सांगणार त्याविषयी!

लवकरच दिसणार पडद्यावर;अजय देवगणने केली घोषणा

स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘बिग बुल’ हा बिग बजेट चित्रपट येत्या ८ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ३० मिनिटांच्या टीझरमध्ये एका ब्रोकरचा स्टॉक मार्केटमधला सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवला आहे. या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण याने या टीझरमधून प्रमुख पात्राची ओळख करुन देण्यासाठी आवाज दिला आहे. या चित्रपटाच्या टीमने हा टीझर प्रदर्शित केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

या चित्रपटाची कथा हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित असली तरी यातल्या एका सीनमध्ये अभिषेक सही करताना दिसत आहे. ही सही तो हेमंत शाह या नावाने करत आहे. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की, निर्मात्यांनी या ठिकाणी काल्पनिक नाव वापरून कथा सांगितली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांचं आहे.तर अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:55 pm

Web Title: ajay devgan declares new movie with abhishek bachchan based on harshad mehta story vsk 98
Next Stories
1 पहा आता तैमूरला करावं लागतंय घरातलं काम!; लहान भावासाठी काय पण…
2 “तू मिस वर्ल्ड आहेस म्हणून काय झाल?”; कोरिओग्राफरने प्रियांकावर फेकला होता माईक
3 तिचे अनेक रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, गौहर खानच्या टीमचं स्पष्टीकरण
Just Now!
X