News Flash

‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

'निवडणूक प्रचारासाठी मला ब्लॅकमेल केलं'; अमिशा पटेलचा खळबळजनक आरोप

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क बिहार विधानसभा निवडणूकीचे उमेदवार डॉ. प्रकाश चंद्रा यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यांनी अमिशाकडून जबरदस्तीने निवडणूकीचा प्रचार करुन घेतला. शिवाय बलात्काराची धमकी देखील दिली. असा खळबळजन आरोप तिने केला आहे.

अवश्य पाहा – IPLसाठी किंग खानच्या ‘सुहाना’ची खास तयारी; पाहा तिचे व्हायरल झालेले फोटो

नेमकं हे प्रकरण काय आहे?

LJP नेता प्रकाश चंद्रा यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून अमिशा पटेल हिला बोलावलं होतं. २६ ऑक्टोंबर रोजी तिने चंद्रा यांच्यासाठी प्रचार केला. परंतु हा प्रचार तिच्याकडून जबरदस्तीने करुन घेण्यात आला. बिहारमध्ये बोलवून तिला ब्लॅकमेल केलं गेलं असा आरोप अमिशाने केला आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत तिने या प्रकरणावर भाष्य केलं.

अवश्य पाहा – “४ हजार कोटी द्या चित्रपट ऑनलाईन रिलीज करतो”; निर्मात्याची खुली ऑफर

ती म्हणाली, “सुरुवातीला मला पटनाजवळ प्रचार करण्यास सांगितलं होतं. परंतु त्यानंतर मला न सांगता ठिकाण बदललं व ओबरा येथे घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे तिथून संध्याकाळी मी निघणार होते. परंतु त्यांनी मला जाऊ दिलं नाही. उलट धमक्या देऊन माझ्याकडून आणखी प्रचार करुन घेतला. या प्रचारात मला अत्यंत वाईट अनुभव आले. स्टार प्रचारक असुनही मला कुठल्याही प्रकारची सुरक्षा दिली नाही. हजारो लोकांसोबत मी एकटी होते. जर मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला तर वाईट परिणाम होतील. मला ते त्या ठिकाणी एकटीला सोडतील. शिवाय माझ्यावर बलात्कारही होऊ शकतो. अशी धमकी त्यांनी मला दिली होती.” असा आरोप अमिशाने केला आहे. या संदर्भात तिची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान या आरोपांवर प्रकाश चंद्रा यांनी अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 5:14 pm

Web Title: ameesha patel bihar election 2020 dr prakash chandra mppg 94
Next Stories
1 ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ कार्यक्रमाचं परीक्षण करणार ‘धर्मेश सर’
2 १५ नोव्हेंबरपासून सुरू होतोय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’
3 Video : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X