01 March 2021

News Flash

ऐश्वर्याविना बच्चन कुटुंबाची शाही लग्नाला उपस्थिती

या शाही विवाहसोहळ्यात बच्चन कुटुंबाचा रॉयल अंदात पाहावयास मिळाला.

अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे काही दिवसांपूर्वीच अबू धाबीला गेले होते.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे काही दिवसांपूर्वीच अबू धाबीला गेले होते. व्यावसायिक अभिजीत राजन यांची मुलगी अनुष्का राजन हिच्या लग्नासाठीच बच्चन कुटुंब अबू धाबीला पोहचले होते. या शाही विवाहसोहळ्यात बच्चन कुटुंबाचा रॉयल अंदाज पाहावयास मिळाला. या विवाहसोळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, या फोटोंमध्ये केवळ अमिताभ, अभिषेक आणि जया बच्चन दिसतात. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनची अनुपस्थिती या शाही विवाहसोहळ्यात प्रकर्षाने जाणवली.

बच्चन कुटुंब लग्नासाठी अबू धाबीला गेलं होतं त्याचवेळी नेमकी ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर तेव्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, बच्चन आणि राजन कुटुंबामध्ये खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याने अमिताभ त्यांच्या कुटुंबासह या लग्नाला उपस्थित राहिले होते. अभिजीत यांची मुलगी अनुष्का ही अभिषेकला तिचा भाऊ मानते.

अभिषेक बच्चन आणि अनुष्का राजन खालील फोटोत बग्गीत बसलेले दिसतात. सहसा आपण केवळ मुलांचीच वरात पाहतो. पण, अनुष्काच्या लग्नात मात्र उलट झालं होतं. यावेळी चक्क वधू पक्षाने वरात काढली होती.

amitabh-bachchan-and-abhishek-bachchan-pictures-2

लग्नाच्या वेळी अभिषेक जास्तीत जास्त वेळ त्याची मानलेली बहिण अनुष्का हिच्यासोबतच होता. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्याच्या अनुपस्थितीमुळे त्याला नक्कीच त्यांची कमतरता जाणवली असेल यात शंका नाही.

amitabh-bachchan-and-abhishek-bachchan-pictures-1

दरम्यान, या लग्नाचा पुरेपुर आनंद घेत त्याने ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ गाण्यावर नृत्यही केले.

amitabh-bachchan-and-abhishek-bachchan-pictures-4

वधूचा भाऊ बनलेल्या अभिषेकने तिच्या इतर भावांसोबत फोटोसाठी पोज दिली.

amitabh-bachchan-and-abhishek-bachchan-pictures-3

या खास क्षणी अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी फोटोग्राफर्सना निराश न करता कॅमेऱ्यासाठी पोज दिली.

amitabh-bachchan-and-abhishek-bachchan-pictures-7

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 12:28 pm

Web Title: amitabh bachchan attends wedding with abhishek and jaya in abu dhabi
Next Stories
1 ऋषिकेशमध्ये साधुसंतांसोबत दीपिकाने केली गंगा आरती
2 BLOG : …अॅण्ड अॅवार्ड गोज् टू दादा!
3 … म्हणून आमिर आणि जितेंद्र जोशी आले एकत्र
Just Now!
X