26 January 2021

News Flash

प्रभास-दीपिकाच्या चित्रपटात बिग बींची एण्ट्री

प्रभासने सोशल मीडियावर टीझर पोस्ट करत बिग बींसोबत काम करण्याविषयी आनंद व्यक्त केला.

नाग अश्विन दिग्दर्शित आगामी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास व बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची जोडी पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट चित्रपटात बिग बींची एण्ट्री झाल्याने आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभासने सोशल मीडियावर टीझर पोस्ट करत बिग बींसोबत काम करण्याविषयी आनंद व्यक्त केला. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. ‘महानायक अमिताभ बच्चन सरांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न अखेर पूर्ण होतंय’, असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. तर दीपिकाने याआधी ‘पिकू’ चित्रपटात बिग बींसोबत काम केलं होतं.

आणखी वाचा : आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी बॉलिवूडला केला रामराम

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये आयुषमान खुरानाने त्यांच्यासोबत काम केलं होतं. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय ते रुमी जाफरीच्या ‘चेहरे’ आणि अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 1:03 pm

Web Title: amitabh bachchan joins deepika padukone and prabhas in nag ashwin film ssv 92
Next Stories
1 ठरलं तर! सारा आणि वरुण धनवचा ‘कूली नं. १’ या दिवशी होणार प्रदर्शित
2 Confirm : नेहा कक्कर करणार ‘या’ गायकाशी लग्न
3 आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी बॉलिवूडला केला रामराम
Just Now!
X