बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात वावर असणाऱ्या बिग बींची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे बिग बीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळेच सोशल मीडियावरही त्यांचा तितकाच वावर आहे. अलिकडेच अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अमिताभ यांनी थ्रोबॅक फोटो शेअर केला असून त्यांनी खास फोटोशूट केल्याचं या फोटोवरुन दिसून येत आहे. या फोटोपेक्षा त्यांनी दिलेलं कॅप्शन सध्या चाहत्यांमध्ये चर्चिलं जात आहे. “चित्रपट जो कधी पूर्ण झालाचं नाही. फोटोशूट झालं, टायटल मिळालं आणि माझा लूक सुद्धा फायनल झाला. तरी सुद्धा हा चित्रपट पूर्ण झालाच नाही. दु:खद” असं कॅप्शन देत अमिताभ यांनी हा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अमिताभ सध्या छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच ते ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘चेहरे’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत.