सध्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. ‘बचपन का प्यार’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला असून अनेकांना वेड लावलं आहे. बॉलिवूड असो किंवा मराठी सेलिब्रिटी अनेक जण ‘बचपन का प्यार’ या व्हायरल गाण्यावर रील बनवताना दिसतं आहेत.
नुकतचं मराठमोळं क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी ‘बचपन का प्यार’ वर धमाल व्हिडीओ शेअर केलाय. यानंतर आता अमृता खानविलकरने आपल्या आईसोबत ‘बचपन का प्यार’वर मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. खास गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ शेअर करण्यासाठी उमेश कामत आणि प्रिया बापट कारणीभूत ठरले आहेत.
या व्हिडीओमागचा किस्सा अमृताने कॅप्शमध्ये सांगितला आहे. तिने लिहिलंय, “काही दिवसांपूर्वी आई म्हणाली अमू मला ‘बचपन का प्यार’वर रील बनवायचंय, तर मी म्हणाले वेडी आहेस का?” यानंतर अमृता कॅप्शनमध्ये म्हणाली “जसं उमेश आणि प्रियाने व्हिडीओ बनवल्याचं पाहिलं मला हे करण्यासाठी भाग पाडलं गेलं.”
View this post on Instagram
अमृताच्या या व्हिडीओला देखील चाहत्यांसोबतच तिच्या अनेक मित्र मैत्रिणींनी आणि कलाकारांनी पसंती दिलीय. अभिनेत्री सोनाली खरेने “खूप खूप मस्त” असं म्हणत अमृता आणि तिच्या आईचं कौतुक केलंय.
पहा व्हिडीओ: ‘आणि काय हवं’; ‘बचपन का प्यार’ व्हायलर गाण्यावर उमेश कामत आणि प्रियाची धमाल
दरम्यान अमृताने व्हिडीओ शेअऱ करण्याच्या काही तासांपूर्वीत अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापटने ‘बचपन का प्यार’वर मजेशीर व्हिडीओ शेअऱ केला होता. या व्हिडीओला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे.