परिकथा ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. या परिकथेतील सर्वाधिक गाजलेली परिकथा म्हणजे ‘स्लीपिंग ब्यूटी’ होय. दृष्ट चेटकीणीकडून श्राप मिळालेल्या राजकन्येला राजकुमार वाचवतो अशा स्वरूपाची ही परिकथा आजही तितकीच लोकप्रिय आहे. मात्र वर्षांनूवर्षे आपण ऐकत आलेल्या या परिकथेची दुसरी बाजू जगासमोर आणली ती अँजेलिना जोलीच्या मॅलेफिसन्टनं. हा चित्रपट अँजेलिना जोलीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता आता या चित्रपटाचा सीक्वल येत आहे.
डिझ्नेनं नुकतीच ‘मॅलेफिसन्ट’ चित्रपटाचा सीक्वल ‘मॅलेफिसन्ट : मिस्ट्रेस ऑफ ऑल इव्हिल’ची घोषणा केली आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र डिझ्नेनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. १९५९ च्या क्लासिक स्लीपिंग ब्यूटीची सर्वात गाजलेली खलनायिका मॅलेफिसन्ट हिच्या आत्तापर्यंत न सांगितल्या गेलेल्या कथेचा शोध ‘मॅलेफिसन्ट’मध्ये घेण्यात आला आहे.
Angelina Jolie returns in Maleficent: Mistress of Evil. Coming to theaters October 18, 2019. pic.twitter.com/KikT5htvJl
— Walt Disney Studios (@DisneyStudios) March 6, 2019
चांगली परी सूडग्रस्त का होते, फसवणुकीमुळे तिचं चांगलं हृदय दगडासारखं कसं बनलं, सूडबुद्धीने पेटून ती बाल्यावस्थेतील राजकन्येला मागे घेता येणार नाही असा शाप कसा देते यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ‘मॅलेफिसन्ट’ मध्ये आहेत. आता पुढच्या भागात सुडानं पेटून उठलेल्या या परीचं कोणती नवी बाजू पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे. २०१४ पासूनच मॅलेफिसन्टचा स्वीक्वल येणार अशी चर्चा होती.