सलमान खान ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर येत आहे. या शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने नव्या सिझनची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. कारण या प्रोमोमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड होत आहे. आगामी ‘फन्ने खान’च्या प्रमोशनसाठी अनिल कपूरने या शोमध्ये हजेरी लावली आणि त्यांनी जेव्हा सलमानसमोर ऐश्वर्याचं नाव घेतलं, तो क्षण प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
अनिल कपूरने ऐश्वर्याचं नाव घेतल्यावर सलमानची प्रतिक्रिया आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षकही जोरजोरात ओरडू लागले. ‘फन्ने खान’ चित्रपटात अनिल कपूरच्या मुलीची भूमिका साकारणारी पीहू संद हीसुद्धा त्यावेळी उपस्थित होती. चित्रपटाबाबत सांगताना अनिल कपूर म्हणाला की, ‘आमची जी लता आहे ती बेबी सिंहची मोठी चाहती आहे. बेबी सिंहची भूमिका ऐश्वर्या राय साकारत आहे.’ तेव्हा सलमानने ‘अच्छा’ म्हणत उत्तर दिलं. यावर प्रेक्षक टाळ्या वाजवत ओरडू लागले. मग अनिल कपूर म्हणतो, ‘ऐश्वर्या राय बच्चन’. यावर सलमान हसतो. प्रोमोमधील हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत असून शोमध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
ऐश्वर्या आणि सलमानचं प्रेमप्रकरण तर जगजाहिर आहे. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे आता एकमेकांसमोर येणंही टाळतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 12:21 pm