News Flash

“कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप

अनुरागने औरंगाबाद दुर्घटनेवर केलं ट्विट

५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हद्दपार करुन जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतरही तीन दिवसांनी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी ८ वाजता मोदींनी याच विषयावर देशाला संबोधित करत या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेशाचा विकास होईल असं म्हटलं होतं. ३७० संदर्भात निर्णय घेण्यात आलेला महिना म्हणजेच ऑगस्ट हा ही वर्षातील आठवा महिना आहे हे ही विशेषच.

जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटे बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी दिग्दर्शक अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “…म्हणून मोदींनी देशाला ७० वर्षे मागे नेलं”; अभिनेत्याचा टोला

“हे कुठल्या प्रकारचे पंतप्रधान आहेत? मदत करायला कोणाला पाठवणार? मदतीसाठी आता जाउन काय फायदा? कृपया जे जिवंत आहेत त्यांचा तरी जीव वाचवा. उगाचच गरज नसताना काहीही बोलू नका. सर्वप्रथम स्वत:ची चूक कबुल करा आणि ती सुधारा.” अशा आशयाचे ट्विट अनुरागने केले आहे. अनुराग समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर रोखठोकपणे आपलं मत मांडतो. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – मेडिकलमधून दारु खरेदी केली का?; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अभिनेत्री म्हणाली…

नेमकी घटना काय घडली होती?

जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले होते. जखमीपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येथे नेहण्यात आले आहे. रेल्वे रूग्णालयात जखमींवर उपाचार सुरू आहेत. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 5:31 pm

Web Title: anurag kashyap comment on narendra modi over aurangabad train accident mppg 94
Next Stories
1 Video : सलमानच्या फार्महाऊसवर जॅकलिनने शूट केली शॉर्ट फिल्म
2 “…म्हणून मोदींनी देशाला ७० वर्षे मागे नेलं”; अभिनेत्याचा टोला
3 विकी स्वत:लाच का म्हणतोय, ‘हसबंड मटेरिअल’
Just Now!
X