बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी सोमवारी ११ जानेवारी रोजी छोट्या पाहुणीचे आगम झाले आहे. अनेकांना ही आनंदाची बातमी कळताच त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. आता विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये अशी विनंती फोटोग्राफरला केली आहे.
अनुष्का आणि विराट कोहनीने फोटोग्राफर्सला एक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो फोटोग्राफर्सने काढू नयेत असे म्हटले होते. ‘आई-वडिल म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा- धोनी, रोहितनंतर विराटला कन्यारत्न; अमिताभ बच्चन यांनी केलं हटके ट्विट
पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले आहे. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला खात्री आहे तुम्ही आम्हाला समजून घ्याल’ असे त्यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा- ‘ही’ व्यक्ती ठेवणार विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव
य़ापूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका चिमुकलीचे आगम झाल्याचे सांगितले होते. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.