छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ या मालिकेतील अभिजीत राजे, आसावरी, शुभ्रा आणि विशेषतः बबड्या हे पात्र प्रेक्षकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आहेत. दरवेळी सासू-सुनेचं भांडण असणारी मालिका साऱ्यांनीच पाहिली. परंतु, या मालिकेत सासूला पाठिंबा देणारी सून पाहायला मिळाली होती. मालिकेतील बबड्या हे नकारात्मक पात्र असले तरी ते साकारणारा अभिनेता आशुतोष पत्कीने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून एक नव्या रुपात आणि नव्या कथानकासह ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील कलाकारही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे बबड्याच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
आता ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका ‘अग्गंबाई सूनबाई’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत देखील आसावरी हे पात्र निवेदिता सराफ आणि अभिजीत राजे हे पात्र गिरीश ओक साकारणार आहेत. शूभ्रा हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान ऐवजी उमा पेंढारकर साकारणार आहे. तर बबड्या हे पात्र अभिनेता आशुतोष पत्की ऐवजी अद्वैत दादरकर साकारणार आहे.
View this post on Instagram
सध्या अद्वैत माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत भूमिका साकारताना दिसत आहे. आता तो ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत दिसणार आहे.
आता ह्या नव्या मालिकेची कथा काय असेल? सध्या सुरु असलेल्या मालिकेशी त्याचा काही संबंध असेल की फक्त नावातच साम्य आहे? यात अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच आहे. विशेष म्हणजे शुभ्रादेखील एका बाळाची आई झाली आहे. त्यामुळे आता या मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 2:03 pm