छोट्या पडद्यवरील ‘भाभाजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत या मालिकेचे अनेक चाहते आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. या मालिकेत अंगुरी भाभीचं मन जिंकण्यासाठी विभूती नारायणच्या सुरु असलेल्या धमाल युक्त्या प्रेक्षकांना पोटभर हसवतात. तर महमोहन तिवारी यांचं गोरी मेम म्हणजेच अनीता भाभीबद्दल असणारं आकर्षण आणि त्यांचा लाजरा स्वभाव चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.
गोरी मेम म्हणजचे अंगुरी भाभीवर फिदा असणाऱ्या मनमोहन तिवारी यांची खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील खूपच सुंदर आहे. मनमोहन तिवारी म्हणजेच अभिनेता रोहिताश गौड सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. कुटुंबासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ते त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. रोहिताश गौड यांच्या खऱ्या पत्नीचं नाव रेखा गौड आहे. रेखा यादेखील दिसायला सुंदर आहेत. रेखा या अभिनय क्षेत्रात नसल्या तरी सोशल मीडियावर त्या अनेक विनोदी आणि डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात.
View this post on Instagram
रोहिताशदेखील पत्नी रेखासोबत अनेक धमाल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअऱ करत असतात. यात अभिनयाच्या बाबतीतही रेखा रोहिताशला टक्कर देताना दिसत आहेत. या व्हिडीमध्ये रोखा याचं अभिनय कौशल्या आणि डान्स कौशल्य दिसून येतं.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हे देखील वाचा: “पावसाला एक अक्कल नाही…जास्त पडून तुंबई करतो”; केदार शिंदे यांचा बीएमसीला टोला
रोहिताश आणि रेखा गौड यांना दोन मुली आहेत. त्यांच्या एका मुलीचं नाव गीति तर दुसऱ्या मुलीचं नाव संगीति असं आहे. रोहिताश आपल्या मुलींसोबतही अनेक धमाल व्हिडीओ शेअर करत असतात. रोहिताश यांच्या मुलीदेखील अतिशय सुंदर आहेत.
View this post on Instagram
हे देखील वाचा: अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात भूमि पेडणेकर झळकणार, शेअर केला खास फोटो
‘भाभाजी घर पर है’ या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश यांनी अनेक मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत.