25 September 2020

News Flash

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांचा समन्स

तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडून टीआरपीसाठी त्याचे प्रेक्षपणही केले

ओविया

तमिळ रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या सेटवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री ओवियाला पोलिसांनी समन्स बजावला आहे. वैद्यकिय कारणास्तव काही दिवसांपूर्वीच ओवियाने बिग बॉसचे घर सोडले होते.

बिग बॉसचे निर्माता, सूत्रसंचालक आणि वाहिनीने टास्कदरम्यान ओवियाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले आहे. या सर्वांनी तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडून टीआरपीसाठी त्याचे प्रेक्षपणही केले, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. ४ ऑगस्टला ओलिवियाने पूलमध्ये बुडून जीव देण्याचा प्रयत्न केलेला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी असा आग्रहदेखील तक्रारकर्त्याने पोलिसांना केला.

वाचा : नेहा धुपियाचा अपघात, मदतीऐवजी लोक सेल्फी काढण्यात मग्न

याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलेय. ‘आम्ही समाज कल्याण निंबधकामध्ये तक्रार दाखल केलीय. ओलिवियाच्या सेक्रेटरीची याविषयी चौकशी केली असता तिने असे काहीही न केल्याचे म्हटले,’ असे पोलिसांनी ‘द हिंदू’शी बोलताना सांगितले.

वाचा : ‘बिग बॉस ११’ मध्ये येण्यासाठी या हॉट अभिनेत्रीला चक्क २ कोटींची ऑफर

तमिळ ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन अभिनेता कमल हसन करत असून, ओविया ही या शोमधील प्रसिद्ध स्पर्धक आहे. याच शोमधील स्पर्धक आरवबद्दल असलेल्या भावना लपवणे ओवियाला कठीण जात होते. तिने आपल्या प्रेमाची कबुलीही त्याला दिली होती. अखेर ओवियाने शोमधून निघण्याचा निर्णय घेतला. शोमधील शेवटच्या काही दिवसांमध्ये ओविया मानसिक दबावाखाली वावरत असल्याचे दिसलेले.

दरम्यान, स्पर्धकांच्या वर्तनामुळे ‘बिग बॉस’ शोलाही कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 3:11 pm

Web Title: bigg boss tamil oviya summoned by cops for alleged suicide attempt
Next Stories
1 ‘मेलबर्न  आयएफएफएम २०१७’ मध्ये मुलीसह ऐश्वर्याने केले ध्वजारोहण
2 ..अन् दिग्दर्शकावरच भडकला अक्षय कुमार
3 VIDEO: राष्ट्रगीताचं असं खास व्हर्जन तुम्ही आधी पाहिलं नसेल
Just Now!
X