News Flash

बिपाशाने करणसोबत शेअर केला रोमॅण्टिक फोटो; म्हणाली…

बिपाशाने सेलिब्रेट केला करवाचौथ

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून कायमच बिपाशा बासूकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनय आणि बोल्डनेसच्या जोरावर आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर आता बिपाशाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अनेकदा बिपाशा तिचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यामध्येच तिने आता पती करण सिंग ग्रोवरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे.

बिपाशाने शेअर केलेला फोटो खास करवाचौथच्या निमित्ताने काढल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये बिपाशाने नारंगी रंगाचा ड्रेस घातला असून करणने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. ”करणसोबत करवाचौथचं सेलिब्रेशन. तू करत असलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे”, असं कॅप्शन बिपाशाने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, यापूर्वी तिने गेल्या वर्षी सेलिब्रेट केलेल्या करवाचौथचाही व्हिडीओदेखील शेअर केला होता. सध्या बिपाशाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. ‘अलोन’ या चित्रपटानंतर बिपाशा फारशी कोणत्या चित्रपटांमध्ये झळकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 2:15 pm

Web Title: bipasha basu celebrates karwa chauth hubby karan singh grover dcp 98
Next Stories
1 लग्नानंतर नेहाचा पहिला करवाचौथ; शेअर केला खास व्हिडीओ
2 सुबोध भावेची नवीन मालिका या तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘आमच्या भावनांशी खेळू नकोस’; दया बेनच्या ‘त्या’ फोटोंवर चाहते संतापले
Just Now!
X