News Flash

अमित साध करणार करोना चाचणी? वाचा नेमकं काय आहे प्रकरण

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अमित म्हणतो...

चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना आतापर्यंत या विषाणूची लागण झालाचं पाहायला मिळालं. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनादेखील करोनाची लागण झाली असून आता लोकप्रिय अभिनेता अमित साध यालादेखील करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या अमित साधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो लवकरच करोनाची चाचणी करणार असल्याचं म्हटलं आहे. अमित अलिकडेच ‘ब्रीद :इन शॅडोज’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. यात त्याने अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by AMIT SADH (@theamitsadh) on

अभिषेक बच्चनची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमितनेदेखील करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माझ्याविषयी काळजी वाटल्यामुळे आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. मी सध्या फिट आहे आणि माझी प्रकृतीदेखील व्यवस्थित आहे. परंतु, आज मी करोनाची चाचणी करण्यासाठी जाणार आहे, असं अमितने म्हटलं आहे.

दरम्यान, ही पोस्ट शेअर करत त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोन्ही कलाकार लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली आहे. अमित आणि अभिषेकने ‘ब्रीद :इन शॅडोज’ या वेबसीरिजमध्ये स्क्रीन शेअर केली होती. यात अमितने कबीर सावंत ही भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:59 pm

Web Title: bollywood actor amit sadh going to take corona test shared post in instagram account ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जयसाठी विरूची प्रार्थना! बिग बींना करोना झाल्यामुळे धर्मेद्र चिंतेत
2 ‘जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं
3 ‘शक्तिमान’मधून किटू गिडवाणीला बाहेर का केलं?; मुकेश खन्नांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Just Now!
X