08 March 2021

News Flash

‘ब्लॅक पँथर’च्या शेवटच्या ट्विटनं रचला विक्रम; ट्विटरनं देखील केला ‘किंग ऑफ वकांडा’ला सलाम

ट्विटरच्या इतिहासात असा विक्रम आजवर कुठल्याचं ट्विटने केला नव्हता

सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’ फेम अभिनेता चॅडविक बोसमन याचं निधन झालं आहे. तो केवळ ४३ वर्षांचा होता. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगामुळे त्रस्त होता. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चॅडविकच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान त्याच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेलं शेवटचं ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणारं ट्विट ठरलं आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली. चॅडविकच्या या ट्विटला आतापर्यंत ६७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच २३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जगभरातील लाखो चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉसमन याने लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्याच्या सोबत होते. बोसमन हा कोलोन कॅन्सरने त्रस्त होता. “ते खरंच एक लढवैय्ये होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. या चित्रपटांवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती”, असं बोसमन यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं.

चॅडविक बोसमन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होता. ‘किंग ऑफ वकांडा – ब्लॅक पँथर’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार देखील पटकावला होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चॅडविकचं निधन झालं. परिणामी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 6:19 pm

Web Title: chadwick bosemans final post becomes twitters most liked tweet ever mppg 94
Next Stories
1 चाहत्याकडून अभिनेत्यांना अनोखी भेट!
2 टायगरने ‘मून वॉक’ करत मायकल जॅक्सनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ…
3 रिचा चड्ढाने सांगितले भांगचे फायदे, नेटकऱ्यांनी सुनावले
Just Now!
X