News Flash

‘छोटी मालकीण’मध्ये नवा ट्विस्ट; पाककृती स्पर्धा जिंकून रेवती करेल का श्रीधरला मदत?

श्रीधरच्या मदतीसाठी आता रेवतीही पुढे सरसावली आहे.

'छोटी मालकीण'मध्ये नवा ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत रेवती आणि श्रीधर यांच्यात आता हळवं नातं तयार होत आहे. शेतीच्या कामासाठीची साधनं घेण्यासाठी श्रीधरची धडपड सुरू आहे. त्यासाठी तो पैसे जमा करत आहे. श्रीधरच्या मदतीसाठी आता रेवतीही पुढे सरसावली आहे. गावातल्या एका पाककला स्पर्धेत तीने सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा जिंकून रेवती श्रीधरला मदत करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

एकीकडे श्रीधरच्या कर्जाचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. त्यामुळे पैसे उभे करण्यासाठी त्यानं स्वतःची बाईक विकली. सुमननं दागिने विकून पैसे दिले आहेत. सगळेजण श्रीधरला मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मग रेवतीलाही वाटतं, की आपणही श्रीधरला मदत केली पाहिजे. अशातच गावातल्या सितारा महिला मंचातर्फे ‘धमाल सासु-सुनेची, कमाल पाककलेची’ ही स्पर्धा जाहीर होते. स्पर्धेच्या विजेत्याला एक लाखाचं पारितोषिक दिलं जाणार असतं. त्यात रेवती सहभागी होते. मात्र, त्या स्पर्धेत रेवतीची आई आणि अभिलाषाही सहभागी झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या आईला हरवून रेवती ही स्पर्धा जिंकणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

वाचा : हिंदी चित्रपटसृष्टी सासर तर मराठी चित्रपटसृष्टी माहेर- माधुरी दीक्षित

पाककला स्पर्धेत रेवती जिंकणार का? श्रीधरला स्प्रे घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा होणार का? या प्रश्नांची उत्तरं ‘छोटी मालकीण’ या मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 7:59 pm

Web Title: choti malkein marathi serial revati going to take part in recipe contest to help shridhar
Next Stories
1 आता जपानीही झाले बाहुबलीचे फॅन, पाठवल्या या अनोख्या भेटवस्तू
2 आलिया, अनुष्काचे डिझायनर कपडे हवे आहेत का, तर मग हे कराच
3 ‘या’ कारणामुळे रिसेप्शनमध्ये आनंदने घातले स्पोर्ट्स शूज
Just Now!
X