12 August 2020

News Flash

खरा सुपरहिरो! ‘या’ सहा वर्षांच्या मुलाला मार्व्हलने दिली ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड

बहिणीला वाचवताना त्याला पडले ९० टाके

“सुपरहिरो होण्यासाठी जादुई शक्तिंची गरज नसते. फक्त मनात इच्छा आणि मदत करण्याची प्रवृत्ती हवी तुम्ही आपोआप सुपरहिरो होता.” हे तत्वज्ञान ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’ या चित्रपटात आयर्नमॅनने स्पायडरमॅनला सांगितलं होतं. या वाक्याला फॉलो करत एका सहा वर्षांच्या मुलाने आपल्या चार वर्षांच्या बहिणीचे प्राण वाचवले. त्याने आपल्या बहिणीसाठी पिसळलेल्या कुत्र्यासोबत भीषण युद्ध केले. या युद्धात तो जबरदस्त जखमी झाला आहे. त्याला तब्बल ९० टाके पडले आहेत. या मुलाच्या पराक्रमाची थेट सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या मार्व्हल युनिव्हर्सने नोंद घेतली. व त्याला बक्षिस म्हणून सुपरहिरो ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड दिली.

 

View this post on Instagram

 

There are no words. We are so, so thankful.

A post shared by Nikki Walker (@nicolenoelwalker) on

या धाडसी मुलाचं नाव ब्रिजर वॉकर असं आहे. त्याची मोठी बहिण निक्की वॉकर हिने ब्रिजरच्या लढाईची संपूर्ण स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती. ही थक्क करणारी स्टोरी व जखमी ब्रिजरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या स्टोरीची नोंद मार्व्हल युनिव्हर्सने देखील घेतली. अॅव्हेंजर्स चित्रपटात झळकलेले ख्रिस इव्हान (कॅप्टन अमेरिका), मार्क रफेलो (हल्क), ख्रिस हॅम्सवर्थ (थॉर), जेरेमी रेनर होकाय), स्कार्लेट जॉन्सन (ब्लॅक विडो) या कलाकारांनी स्वत: त्याच्या घरी जाऊन त्याचं कौतुक केलं. त्यांनी त्याला बक्षिस म्हणून कॅप्टन अमेरिकाची शिल्ड दिली. लक्षवेधी बाब म्हणजे ही शिल्ड अॅव्हेंजर्सच्या पहिल्या चित्रपटात ख्रिस इव्हानने वापरली होती. ब्रिजर वॉकरवर सध्या सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 8:27 pm

Web Title: chris evans gifting authentic captain america shield to hero boy mppg 94
Next Stories
1 अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं केली कमाल; काही दिवसांत मिळवले तब्बल इतके कोटी व्ह्यूज
2 ‘या’ सहा लोकांपासून नेहमी दूर राहा; अमिताभ बच्चन यांचा सल्ला
3 गौरी खानने शेअर केला वर्कप्लेसचा व्हिडीओ
Just Now!
X